संवादाच्या माध्यमातून धार्मिक स्थळांवरील ध्वनीक्षेपक हटवण्यात यश ! – योगी आदित्यनाथ

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटले की, राज्यशासनाने संवादाच्या माध्यमातून धार्मिक स्थळांवरील अनावश्यक ध्वनीक्षेपक हटवण्यात यश प्राप्त केले आहे. यापुढे धार्मिक स्थळांवर अनावश्यक ध्वनीक्षेपक लावल्याच्या अथवा मोठ्या आवाजात लावल्याच्या तक्रारी प्रशासनाला प्राप्त झाल्यास  संबंधित उपजिल्हाधिकारी आणि पोलीस अधिकारी पुढील प्रक्रिया करण्यासाठी उत्तरदायी असतील.

संपादकीय भूमिका

इच्छाशक्ती असल्यास काय होऊ शकते, याचेच हे उदाहरण ! असेच सर्व भाजपशासित राज्यांनी करावे, असेच हिंदूंना वाटते ! तसेच आतापर्यंत असे का करता आले नाही, याचाही विचार व्हायला हवा !