
वणी (यवतमाळ), १३ मे (वार्ता.) – येथील टागोर चौकातील विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या सभागृहात ९ मे या दिवशी हिंदु राष्ट्र-जागृती सभा भावपूर्ण वातावरणात पार पडली. हिंदु धर्मावर धर्मनिरपेक्षतेच्या आडून येणारी संकटे, तसेच धर्मांधांकडून होणारी आक्रमणे यांविषयी सभेत जागृती करण्यात आली. सभेसाठी विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे साहाय्य लाभले.

सनातन संस्थेच्या सौ. मंगला दरवे म्हणाल्या, ‘‘मंदिरे ही चैतन्याचा स्रोत आहेत. मंदिर सरकारीकरणामुळे पूजा-अर्चा करण्यावर बंधने लादली जात आहेत. मंदिरे सरकारच्या तावडीतून सोडवण्यासाठी आपण हिंदु जनजागृती समितीच्या कार्यात सहभागी होऊया.’’ समितीचे श्री. प्रफुल्ल टोंगे यांनी घटनेमध्येही हिंदूंवर कसा अन्याय झाला आहे, याविषयी सांगितले.
दिघी (पुणे) पोलीस ठाण्यातील महिला पोलीस उपनिरीक्षकास लाच घेतांना अटक !
आषाढी यात्रेनिमित्त विधीवत् पूजा करून श्रींचा पलंग काढला : २४ घंटे दर्शन चालू !
पाणी योजना रखडल्याने मुख्यमंत्री आणि पालकमंत्री संतप्त !
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांच्या पालखीचे लोणंद ते तरडगाव प्रस्थान !
भाजपचे कार्यकर्ते सूरज साखरे यांच्यावर अज्ञातांचा गोळीबार !
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्याचे पहिले उभे रिंगण पार पडले