‘आर्.डी.एक्स्.’चा वापर मुंबईतील लोकलमध्ये साखळी बाँबस्फोट करण्यासाठी ?
नांदेड – खलिस्तानी आतंकवादी हरविंदर सिंह रिंदा याने नांदेडमध्ये ‘स्लीपर सेल’च्या (आतंकवाद्यांच्या छुप्या गटाच्या) साहाय्याने आर्.डी.एक्स्. पाठवले होते, अशी माहिती सूत्रांकडून समजली आहे. (ही माहिती महाराष्ट्र आतंकवादविरोधी पथकाला का मिळाली
नाही ? – संपादक)
मुंबईत साखळी बाँबस्फोट घडवून आणले जाणार असल्याची शक्यता मध्यंतरी वर्तवण्यात आली होती. नांदेडमध्ये सापडलेले आर्.डी.एक्स्. हे त्याच कारणासाठी वापरण्यात येणार असल्याची शक्यता व्यक्त होत आहे.
खलिस्तानी आतंकवादी हरविंदर सिंह रिंदा याने नांदेडमधील लोकांकडून जवळपास २०० कोटी रुपयांची वसुली केली आहे. या पैशांचा उपयोग तो आतंकवादी कृत्यांसाठी करणार होता. सध्या रिंदा हा पाकिस्तानातील इस्लामाबाद शहरात असून तेथून तो आतंकवादी कारवायांसाठी शस्त्रपुरवठा करत आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
(साभार : ‘एबीपी माझा’ वृत्तवाहिनीचे संकेतस्थळ)