सायबर गुन्ह्यातील पहिलीच शिक्षा !
नाशिक – अल्पवयीन मुलींशी मैत्री करून त्यांना घरी बोलावत अक्षय राव (वय २८ वर्षे) याने भ्रमणभाषमध्ये त्यांची विवस्त्र छायाचित्रे काढून ती अश्लील संकेतस्थळावर प्रसारित केली. या प्रकरणी त्याला ३ वर्षे ६ मास सक्तमजुरी आणि ३ लाख रुपये दंड अशी शिक्षा मुख्य न्यायदंडाधिकारी व्ही.एल्. भोसले यांनी ६ मे या दिवशी सुनावली. ५ जिल्ह्यांत सायबर गुन्ह्यात ही पहिलीच शिक्षा ठरली आहे. जुलै २०१६ ते १२ जून २०१७ या कालावधीत आरोपी अक्षय याने त्याच्या ओळखीच्या २ अल्पवयीन मुलींशी मैत्री करून त्यांची विवस्त्र छायाचित्रे भ्रमणभाषवर काढली होती. या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता.
संपादकीय भूमिकाअशा प्रकारे कठोर शिक्षा झाल्याविना हे प्रकार थांबणार नाहीत ! |