विलेपार्ले येथील एल्.आय.सी.च्या कार्यालयाला भीषण आग !

एल्.आय.सी. योजनाधारकांची कागदपत्रे जळल्याची शक्यता

मुंबई – सांताक्रूझ येथील एल्.आय.सी.च्या कार्यालयातील दुसऱ्या मजल्यावर  ७ मे या दिवशी भीषण आग लागली होती. सकाळी ७ वाजता आग लागली; मात्र आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. अग्नीशमन दलाच्या ८ गाड्यांद्वारे आग विझवण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. आगीमध्ये पुष्कळ प्रमाणात हानी झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अनेक एल्.आय.सी. योजनाधारकांची कागदपत्रेही जळून खाक झाल्याची शक्यता आहे.

‘आम्ही सर्वदृष्ट्या प्रयत्न करत असल्याने ग्राहकांना सेवा देण्यात कोणतीही अडचण येणार नाही’, असे कार्यालयाने स्पष्ट केले आहे.