‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ने ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे केलेली वैज्ञानिक चाचणी
‘व्यक्तीच्या जन्मकुंडलीवरून ‘तिचे एकंदर आयुष्य कसे असेल’, याचा वेध घेता येतो, तसेच तिच्या जन्मकुंडलीवर आधारित गोचर (वर्तमान) कुंडलीवरून ‘तिचे चालू वर्तमानातील आयुष्य कसे असेल’, याचा वेध घेता येतो. ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’चे ज्योतिष विशारद श्री. राज कर्वे यांनी परात्पर गुरु डॉक्टरांची जन्मकुंडली आणि त्यांची गोचर कुंडली यांचा अभ्यास करून ‘त्यांच्या जन्मकुंडलीतील चंद्र, मंगळ आणि शनि, तर गोचर कुंडलीतील रवि, बुध अन् शनि हे ग्रह परात्पर गुरु डॉक्टरांच्या महामृत्यूयोगासाठी कारणीभूत आहेत’, असे सांगितले.
‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावरील महामृत्यूयोगाचे संकट टळून त्यांना चांगले आरोग्य प्राप्त व्हावे’, यासाठी २२.१.२०२२ या दिवशी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात महामृत्यूंजय याग करण्यात आला. या यागात परात्पर गुरु डॉ. आठवले यांची जन्मकुंडली आणि गोचर कुंडली ठेवून त्यांच्यावर (कुंडल्यांवर) होणारा परिणाम ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ उपकरणाद्वारे अभ्यासण्यात आला. या संदर्भातील वैशिष्ट्यपूर्ण संशोधन पुढे दिले आहे.
१. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मकुंडलीची ‘यू.ए.एस्.’ निरीक्षणे
वर आणि बाजूला दिलेल्या दोन्ही सारण्यांतील सामायिक टीपा
टीप १ – चाचणीस्थळी जागा अपुरी पडल्याने त्यापुढे अचूक प्रभावळ मोजता आली नाही.
टीप २ – यागापूर्वी सर्वच ९ ग्रहांचे नमुने वापरून प्रभावळी मोजण्यात आल्या. यातून जन्मकुंडलीत ‘कोणत्या ग्रहांची स्पंदने किती प्रमाणात दूषित आहेत ?’, हे समजले. सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनीही दूषित ग्रहांच्या संदर्भातच त्यांना दाब जाणवत असल्याचे सांगितले. त्यामुळे यागानंतर केवळ दूषित ग्रहांच्या प्रभावळी मोजल्या, तरी पुरेशा असल्याने तेवढ्या ग्रहांचेच नमुने वापरून परीक्षण करण्यात आले.
२. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या गोचर कुंडलीची ‘यू.ए.एस्.’ निरीक्षणे
वरील सारण्यांतून पुढील सूत्रे लक्षात आली.
१. यागापूर्वी, याग चालू असतांना आणि यागानंतरही परात्पर गुरु डॉक्टरांच्या दोन्ही कुंडल्यांमध्ये नकारात्मक ऊर्जा आढळून आली नाही.
२. यागापूर्वी दोन्ही कुंडल्यांमध्ये सकारात्मक ऊर्जा होती. याग आरंभ झाल्यावर कुंडल्यांतील सकारात्मक ऊर्जेत उत्तरोत्तर वाढ होत गेली.
३. ग्रहांचे नमुने वापरून घटकाचे (कुंडलीचे) परीक्षण करतांना ‘ऑरा स्कॅनर’च्या भुजा उघडणे, म्हणजे त्या घटकात (कुंडलीत) त्या ग्रहाची दूषित स्पंदने विद्यमान असणे होय. यागापूर्वी परात्पर गुरु डॉक्टरांच्या जन्मकुंडलीतील चंद्र, मंगळ आणि शनि, तर गोचर कुंडलीतील रवि, बुध अन् शनि या ग्रहांची स्पंदने दूषित असल्याने त्यांच्या प्रभावळी आल्या होत्या. याग आरंभ झाल्यानंतर त्या ग्रहांच्या प्रभावळी टप्प्याटप्प्याने अल्प होत गेल्या. यागानंतर परात्पर गुरु डॉक्टरांच्या दोन्ही कुंडल्यांचे परीक्षण करतांना ‘ऑरा स्कॅनर’च्या भुजा उघडल्या नाहीत. याचा अर्थ यागानंतर कुंडल्यांमध्ये त्या त्या ग्रहांची दूषित स्पंदने आढळून आली नाहीत.
यातून ‘परात्पर गुरु डॉक्टरांना महामृत्यूंजय यागातून मिळालेल्या चैतन्यामुळे त्यांच्या कुंडल्यांतील त्या त्या ग्रहांच्या दूषित स्पंदनांचा प्रभाव नाहीसा झाला. त्यामुळे परात्पर गुरु डॉक्टरांचे महामृत्यूयोगापासून रक्षण झाले’, असे लक्षात आले. या अभिनव संशोधनाची सेवा करण्याची संधी मिळाली, यासाठी परात्पर गुरु डॉक्टरांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’
– सौ. मधुरा धनंजय कर्वे, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (२७.१.२०२२)