धर्मांधाने हिंदु नाव धारण करून अल्पवयीन हिंदु मुलीला अडकवले प्रेमाच्या जाळ्यात !

इंदूर (मध्यप्रदेश) – उत्तरप्रदेशच्या गाजीपुरा येथील अबू जैद (वय २७ वर्षे ) नावाच्या धर्मांधाने ‘राहुल’ असे हिंदु नाव धारण करून शहरातील एका १७ वर्षीय अल्पवयीन हिंदु मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. येथील काही हिंदु संघटनांना या प्रकरणाची माहिती मिळताच त्यांनी अल्पवयीन मुलीला धर्मांधाच्या तावडीतून सोडवले.
‘लव्ह जिहाद’च्या या घटनेचा प्रारंभ सुमारे ६ मासांपूर्वी इंस्टाग्रामच्या माध्यमातून झाला. इंस्टाग्रामवर हिंदु मुलीची अबू जैद याच्याशी मैत्री झाली. या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. १३ एप्रिलला पीडित मुलीचा वाढदिवस होता. ती संधी साधून मुलीला पळवून नेण्याच्या हेतूने अबू जैद याने इंदूर गाठले. १४ एप्रिलला त्याने पीडित मुलीला बैरवा समाजाच्या धर्मशाळेजवळ भेटण्यासाठी बोलावले. मुलगी बराच वेळ घरी न परतल्याने तिचे पालक आणि शेजारी यांनी शोध चालू केला. शहरातील काही हिंदु संघटनांना या ‘लव्ह जिहाद’च्या प्रकरणाची माहिती मिळाली. त्यांनी आरोपीला पकडून पोलिसांच्या कह्यात दिले, तसेच हिंदु अल्पवयीन मुलीची धर्मांधाच्या तावडीतून सुटका केली.
संपादकीय भूमिका
धर्मांध हे लव्ह जिहाद कायद्यालही जुमानत नाहीत, हे लक्षात घ्या. यावरून त्यांना कठोर शिक्षा होण्यासाठी पावले उचलणे आवश्यक !
Mohammed Zubair AltNews : (म्हणे) ‘कॉकरोच जनता पक्षा’च्या आंदोलकांनी केलेल्या दगडफेकीत पोलीस घायाळ झाले नाहीत !
Somalians Get Life Imprisonment : नौका कह्यात घेऊन खलाशांना ओलीस ठेवणार्या सोमालियाच्या ४४ नागरिकांना जन्मठेप !
जंजिरा दुर्गावर कायमस्वरूपी भगवा ध्वज फडकवा, अन्यथा तीव्र आंदोलन करू ! – ‘सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान’ची चेतावणी !
Modi On Paper Leak : प्रश्नपत्रिका फुटीतील दोषींवर कठोर कारवाई केली पाहिजे ! – पंतप्रधान मोदी
Sikkim Tunnel Accident : सिक्किममधील निर्माणाधीन बोगद्यात दरड कोसळली : ८ कामगारांचा मृत्यू
Stray Dogs Attack : भटक्या कुत्र्याच्या आक्रमणात घायाळ झालेल्या मुलीला १ लाख रुपयांची हानीभरपाई देण्याचा आदेश