हिंदूंच्या संत-महंतांवर आक्रमण होण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहे. श्रीमंडलाचार्य यांच्या आश्रमावर आक्रमण का करण्यात आले आणि कुणी केले ?, याविषयीचे सत्य जनतेसमोर येणे आवश्यक !
नाशिक – महंत श्रीमंडलाचार्य पीठाधीश्वर स्वामी अनिकेतशास्त्री देशपांडे यांच्या आश्रमावर समाजकंटकांनी आक्रमण केले. आश्रमावर २२ एप्रिलच्या मध्यरात्री काही समाजकंटकांनी दगडफेक केली, तसेच काही दिवसांपूर्वी दारूच्या बाटल्या आश्रमात आणि गोशाळेवर फेकण्यात आल्या होत्या.
या घटनेविषयी पोलीस ठाण्यात तक्रार नोंद केली आहे. ‘‘हे आक्रमण केवळ फक्त स्वामीजींच्या आश्रमावर नाही, तर ‘भगव्या’वर आहे आणि हिंदु धर्मावर आहे. आज स्वामीजी आहेत, तर उद्या तुम्ही आणि आम्ही आहोत, हे लक्षात ठेवा. सत्याचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत आहे. आपण सर्वजण एकत्रित येऊन या समाजकंटकांना धडा शिकवला पाहिजे’’, असे येथील धर्मप्रेमींनी म्हटले आहे.
प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून कारवाई करावी ! – नितीन फळदेसाई, आंतरराष्ट्रीय बजरंग दल, गोवा अध्यक्ष
बांदोडाच्या ग्रामसभेत फर्मागुडी येथील ‘आय.आय.टी.’ला विरोध
‘एकादश तीर्थयात्रा’ योजना राबवल्याबद्दल गोमंतक मंदिर महासंघाकडून गोवा सरकारचे अभिनंदन !
कळसा-भंडुरा प्रकल्पांसाठी कर्नाटक सर्वाेच्च न्यायालयात जाणार
म्हापसा येथे पोलिसात तक्रार नोंद, तर पणजी येथे ‘अभाविप’ची निषेध सभा
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अग्नीशमन विभागाच्या अधिकार्यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस !