श्री हनुमान जयंतीच्या दिवशीही ३ राज्यांत धर्मांधांकडून मिरवणुकांवर आक्रमण

  • कर्नाटकमध्ये आक्षेपार्ह ‘पोस्ट’वरून हनुमान मंदिराची तोडफोड

  • देहली येथे धर्मांधांच्या गोळीबारात पोलीस अधिकारी घायाळ

  • देहली येथे तलवारीद्वारेही आक्रमण

  • ८ पोलीस घायाळ

  • श्रीरामनवमीचा अनुभव असतांना पोलिसांनी श्री हनुमान जयंतीच्या दिवशी मुसलमानबहुल भागांतून मिरवणूक जातांना विशेष सुरक्षा का पुरवली नाही ? किंवा अधिक सतर्कता का बाळगली नाही ? – संपादक
  • श्रीरामनवमीच्या वेळी आक्रमण झाल्यानंतर देशभरातून टीका झाल्यानंतरही धर्मांधांनी श्री हनुमान जयंतीच्या मिरवणुकीवरही आक्रमण करून हिंदूंचा ‘आमचे कुणीही काहीही वाकडे करू शकणार नाही’, हेच दाखवून दिले आहे. ही मानसिकता नष्ट करण्यासाठी हिंदु राष्ट्राला पर्याय नाही ! – संपादक
  • मशिदीच्या छतावरून प्रत्येक वेळी दगडफेक केली जाते, हे पहाता आता प्रतिदिन देशातील प्रत्येक मशिदीच्या छताची पडताळणी पोलिसांनी केली पाहिजे, असा नियमच बनवला पाहिजे ! जर मशिदींवर दगडांचा साठा सापडला, तर त्या मशिदीला प्रशासनाने ठाळे ठोकणे आवश्यक ! – संपादक
  • ‘देशातील अल्पसंख्यांक असुरक्षित आहेत’, असे म्हणणारे निधर्मीवादी आता कुठे आहेत ? – संपादक

नवी देहली – श्रीरामनवमीच्या मिरवणुकांवर देशातील ६ राज्यांमध्ये मुसलमानबहुल भागांत धर्मांधांनी आक्रमण केल्याच्या घटना घडल्यानंतर आता १६ एप्रिल या दिवशी श्री हनुमान जयंतीच्या मिरवणुकांवरही देशातील उत्तराखंड, देहली आणि आंध्रप्रदेश ३ राज्यांत धर्मांधांनी आक्रमण केल्याच्या घटना घडल्या. विशेष म्हणजे राजधानी देहलीतील जहांगीरपुरी येथे करण्यात आलेल्या आक्रमणात बांगलादेशी घुसखोर मुसलमानांचा समावेश असल्याचा आरोप करण्यात येत आहे. यासह कर्नाटकात सामाजिक माध्यमांतून आक्षेपार्ह पोस्ट प्रसारित करण्यावरून धर्मांधांनी एका हनुमान मंदिराची तोडफोड केली.

देहली येथे मशिदीच्या छतावरून दगडफेक

१. जहांगीरपुरी येथे सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास मशिदीजवळून श्री हनुमान जयंतीनिमित्त काढण्यात आलेली मिरवणूक जात असतांना अन्सार नावाच्या स्थानिक नेत्याने हिंदूंशी वाद घातला. त्यानंतर मशिदीच्या छतावरून मिरवणुकीवर दगडफेक करण्यात आली. यामुळे सैरभर झालेले हिंदू पळू लागल्यावर धर्मांधांनी त्यांचा पाठलाग केला. या वेळी धर्मांधांच्या हातात तलवारी होत्या. या संदर्भातील व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाला आहे.

२. धर्मांधांना रोखण्याचा प्रयत्न करणार्‍या पोलिसांवर गोळीबार करण्यात आला, तसेच त्यांच्यावरही दगडफेक करण्यात आली. यात ८ पोलीस घायाळ झाले. या हिंसाचारात अनेक वाहनेही जाळण्यात आली.

३. या प्रकरणी पोलिसांनी १४ धर्मांधांना अटक केली आहे. यात गोळीबार करणार्‍या अस्लमसह अन्सार याचाही समावेश आहे. विशेष म्हणजे अन्सार याच्याविरुद्ध यापूर्वी अनेक गुन्हे नोंद आहेत. अस्लमकडून गोळीबारासाठी वापरण्यात आलेले पिस्तुल जप्त करण्यात आले आहे. सध्या येथे परिस्थिती नियंत्रणात असून तणावपूर्व वातावरण आहे.

४. दंगलखोरांविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल, अशी चेतावणी देहलीचे पोलीस आयुक्त राकेश अस्थाना यांनी दिली आहे. परिस्थिती आता नियंत्रणात असून जहाँगीरपुरीसह इतर संवेदनशील भागांत अधिक पोलीस कुमक तैनात करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.

५. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पोलीस आयुक्त अस्थाना आणि विशेष पोलीस आयुक्त (कायदा आणि सुव्यवसथा) दीपेंद्र पाठक यांच्याशी चर्चा करून योग्य ती कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.

उत्तराखंड येथील आक्रमणात पोलिसांसह १० जण घायाळ

रुडकी (उत्तराखंड) – येथे श्री हनुमान जयंतीच्या निमित्ताने काढण्यात आलेली मिरवणूक मुसलमानबहुल भागातून जात असतांना धर्मांधांनी तिच्यावर मोठ्या प्रमाणात दगडफेक केली. यात पोलिसांसह १० जण घायाळ झाले.

डाडा जलालपूर गावामध्ये बजरंग दलाकडून ही मिरवणूक काढण्यात आली होती. गावातील मुसलमानबहुल भागात ही मिरवणूक पोचली असता तेथे काही घरांच्या छतांवरून दगडफेक करण्यात आली. त्यामुळे हिंदू सैरभर झाले. त्यानंतर धर्मांधांनी २ वाहनांना आग लावली. यानंतर पोलिसांनी बळाचा वापर करून परिस्थिती नियंत्रणात आणली.

कुर्नूल (आंध्रप्रदेश) येथे मशिदीजवळ मिरवणुकीवर आक्रमण

मिरवणुकीत ‘डीजे’ लावण्याला धर्मांधांकडून विरोध !

कुर्नूल (आंध्रप्रदेश) – येथील होलागुठा येथे श्री हनुमान जयंतीची मिरवणूक मशिदीजवळून जात असतांना तिच्यावर धर्मांधांकडून मोठ्या प्रमाणात दगडफेक करण्यात आली. यात १५ जण घायाळ झाले. या प्रकरणी पोलिसांनी २० जणांना अटक केली आहे. विश्‍व हिंदु परिषदेने येथे या मिरवणुकीचे आयोजन केले होते. पोलिसांनी मशिदीजवळून मिरवणूक नेतांना डीजे (मोठी संगीत यंत्रणा) बंद करण्यास सांगितले होते. त्यानुसार मशिदीजवळ तो बंद करण्यात आला होता. (मशिदीसमोरून डीजे लावण्याला विरोध करणार्‍यांची दिवसांतून ५ वेळा भोंग्यांद्वारे ऐकवली जाणारी अजान हिंदूंनी का म्हणून ऐकायची ? पोलीस अशा भोंग्यांवर कारवाई करतांना मात्र शेपूट घालतात, हे लक्षात घ्या ! – संपादक) मिरवणूक मशिदीपासून पुढे थोड्या अंतरावर गेल्यावर पुन्हा डीजे लावल्यावर धर्मांधांनी त्याला आक्षेप घेतला आणि तेव्हा बाचाबाची झाली. त्यानंतर मिरवणुकीवर दगडफेक चालू झाली. यानंतर पोलिसांनी लाठीमार करून सर्वांना पिटाळून लावले. सध्या येथे मेठ्या संख्येने पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

हुब्बळ्ळी (कर्नाटक) येथे कथित आक्षेपार्ह पोस्ट प्रसारित झाल्यावरून धर्मांधांकडून श्री हनुमान मंदिराची तोडफोड

पोलीस ठाण्यावरील आक्रमणात १२ पोलीस घायाळ

हुब्बळ्ळी (कर्नाटक) – येथील जुन्या हुब्बळ्ळी शहरात धर्मांधांनी सामाजिक माध्यमांतून प्रसारित झालेल्या एका पोस्टवरून येथील श्री हनुमान मंदिराची तोडफोड केली. यासह एका रुग्णालयावरही आक्रमण केले. येथील जुने पोलीस ठाण्यावरही आक्रमण करण्यात आले. यात काही पोलीस अधिकारी घायाळ झाले. येथे आता जमावबंदी लागू करण्यात आली आहे.

१. १६ एप्रिलच्या रात्री मोठ्या संख्येने धर्मांधांचा जमाव पोलीस ठाण्याबाहेर गोळा झाला आणि त्यांनी सामाजिक माध्यमांतून आक्षेपार्ह पोस्ट करणार्‍याला अटक करण्याची मागणी केली, तसेच दगडफेक चालू केली. या वेळी पोलिसांनी लाठीमार केला, तसेच अश्रूधुराच्या नळकांड्या फोडून धर्मांधांना पांगवण्याचा प्रयत्न केला.

२. हुब्बळ्ळी-धारवाडचे पोलीस आयुक्त लाभू राम यांनी सांगितले की, या हिंसाचाराच्या प्रकरणी १० जणांना अटक करण्यात आली आहे. सामाजिक माध्यमांतून आक्षेपार्ह पोस्ट प्रसारित करणार्‍यालाही अटक करण्यात आली आहे. या आक्रमणात १२ पोलीस अधिकारी घायाळ झाले आहेत, तसेच आमच्या काही वाहनांचीही हानी झाली आहे. उत्तरदायींवर कठोर कारवाई करण्यात येईल. कुणालाही सोडले जाणार नाही.