बिहारमधील मशिदींवरील भोंग्यांवर बंदी घाला !

बिहारचे भूविज्ञानमंत्री जनक राम यांची मागणी

डावीकडे बिहारचे भूविज्ञानमंत्री जनक राम

पाटलीपुत्र (बिहार) – मी राज्यातील १३ कोटी लोकांना आठवण करून देत आहे की, जेव्हा होळी, दिवाळी, छठ पूजा आणि हिंदूंचे अन्य सण साजरे केले जातात, तेव्हा भोंग्यांचा वापर करण्यावर बंदी घालण्यात येते; मात्र हाच नियम मुसलमानांच्या मशिदींविषयी कधी लागू होत नाही. जेव्हा मशिदींवरील भोंग्यांवरून मोठ्या आवाजात अजान ऐकवली जाते, तेव्हा शेजारी रहाणार्‍या सर्व धर्मियांना त्याचा त्रास होत असतो. त्यामुळे मशिदींवरील भोंग्यांवर बंदी घातली पाहिजे, अशी मागणी राज्याचे भूविज्ञानमंत्री जनक राम यांनी केली आहे.

जनक राम म्हणाले की, जे लोक राज्यघटनेविषयी बोलत असतात, त्यांनी लक्षात घेतले पाहिजे की, जेव्हा मशिदींवरील भोंगे वाजतात, तेव्हा विद्यार्थ्यांना त्रास होत असतो. तुम्ही एका धर्मासाठी (हिंदूंसाठी) भोंग्यांवर बंदी घालता, तेव्हा मशिदींवरील भोंग्यांवरही बंदी घातली पाहिजे.