हरिद्वार येथे संत बैठक घेऊन निषेध व्यक्त !
|
हरिद्वार (उत्तराखंड) – ऋषिकेश येथील निर्वाणी आखाड्याचे चिदानंद मुनी यांच्या आश्रमात मुसलमानांनी नमाजपठण केल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे हरिद्वारच्या संतांनी चिदानंद मुनी यांचा निषेध केला आहे. हरिद्वारमधील शांभवी आश्रमाचे अध्यक्ष स्वामी आनंद स्वरूप यांच्या अध्यक्षतेखाली संतांनी बैठक घेऊन चिदानंद मुनी यांना विरोध केला.
संतांच्या भेटीनंतर स्वामी आनंद स्वरूप यांनी पत्रकारांशी संवाद साधतांना सांगितले, ‘चिदानंद मुनी यांनी पवित्र गंगेला प्रदूषित केल्याने हरिद्वारचे संत त्यांना क्षमा करणार नाहीत. अशा संतांनी केलेले कार्य धर्मविरोधी असल्याचे सांगत काली सेनेने त्यांना निर्वाणी आखाड्यातून काढण्याचा सल्ला दिला आहे.’
काली सेनेचे विनोद गिरी महाराज या घटनेचा निषेध करत म्हणाले, ‘हिंदुविरोधी काम करणारी कोणतीही व्यक्ती किंवा संत यांना काली सेना खपवून घेणार नाही. जे संत सनातन धर्म आणि संस्कृती यांचा अवमान करतात, त्यांच्यावर बहिष्कार टाकून त्यांचे तोंड काळे केले जाईल.’