रायसेन (मध्यप्रदेश) येथे हिंदूंवर आक्रमण करणार्‍या धर्मांधांच्या अवैध बांधकामांवर प्रशासनाकडून कारवाई

  • जर या धर्मांधांनी हिंदूंवर आक्रमण केले नसते, तर त्यांच्या या अवैध बांधकामांवर कारवाई झाली नसती, असे यावरून समजायचे का ? – संपादक
  • ही बांधकामे होईपर्यंत प्रशासन झोपले होते का ? अशी आणखी किती अवैध बांधकामे धर्मांधांनी केली आहेत, याचा शोध मध्यप्रदेश सरकार घेऊन त्यांच्यावर कारवाई करील का ? – संपादक

रायसेन (मध्यप्रदेश) – येथील खमरिया गावामध्ये होळीच्या दिवशी धर्मांधांनी आदिवासी हिंदूंवर केलेल्या आक्रमणात एका आदिवासी हिंदु ठार झाला होता, तर ५० हून अधिक जण घायाळ झाले होते. यानंतर आता प्रशासनाने आरोपी धर्मांधांच्या अनधिकृत बांधकामांवर कारवाई चालू केली आहे. जिल्हा प्रशासनाने वन विभागाच्या साहाय्याने या आरोपींच्या अवैध बांधकामांवर बुलडोजर चालवून ती पाडून टाकली आहेत, तसेच मौल्यवान लाकडी साहित्यही जप्त केले आहे. एकूण १६ पैकी १३ आरोपींना अटकही करण्यात आली आहे. (या आरोपींना फाशीची शिक्षा होण्यासाठी सरकारने प्रयत्न केला पाहिजे, असेच हिंदूंना वाटते ! – संपादक)