(भाकणूक म्हणजे श्री हालसिद्धनाथ देव हा प.पू. भगवान डोणे महाराजांच्या माध्यमातून काळाची भाकिते सांगतो तो सोहळा)

मुंबई – येत्या काळात मराठी सैनिक निधड्या छातीने लढेल, पाकिस्तानचा चौथा भाग भारतात येईल, चीन भारतावर आक्रमण करील, देशात समान नागरी कायदा येईल, जगातील मुसलमान राष्ट्रे उद्ध्वस्त होतील, अशी विविध भाकिते प.पू. भगवान डोणे-वाघापुरे महाराज यांनी १५ मार्च या दिवशी पहाटे भाकणुकीत केली. सद्गुरु बाळूमामा आणि श्री हालसिद्धनाथ भंडारा सोहळ्यात भाकणुकीचा हा कार्यक्रम पार पडला. मूळक्षेत्र म्हणून प्रसिद्ध असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील, कागल तालुक्यातील मेतके येथे हा सोहळा पार पडला.

भगवा झेंडा राज्य करील !
या भाकणुकीत प.पू. भगवान डोणे-वाघापुरे महाराज पुढे म्हणाले, ‘‘सीमाभागात गोंधळ होईल. कर्नाटकातील जलाशयाला भगदाड पडेल. वैरण सोन्याची होईल. वैरण आणि पाणी यांची चोरी होईल. दीड मासाचे धान्य पिकेल. शेतकर्याच्या हातात गाकर आणि खांद्यावर चाबूक राहील. सामान्य माणूस आनंदात राहील. दुधाचा भाव वाढत राहील, नदीकाठची भूमी ओसाड पडेल. महागाई वाढत राहील. दागिने, पैसे मनुष्याला घातक ठरतील. ऊसदरासाठी आंदोलने होतील. भगवा झेंडा राज्य करेल. जाती-धर्मात तेढ वाढेल.’’
Chhattisgarh CM Vishnu Deo Sai : छत्तीसगडमधील सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारशाच्या जतनासाठी राज्यशासन सनातन संस्थेला साहाय्य करणार !
राजस्थानमध्ये वर्ष १९९६ मध्ये झालेल्या बाँबस्फोटाचा निकाल सर्वाेच्च न्यायालयाकडून रहित
भगवान श्रीकृष्णाचा अवमान करणार्या मौलाना जर्जिस अन्सारीच्या प्रतिमेस जोडेमारा आंदोलन
स्त्री तिच्यातील चैतन्य आणि भक्ती यांद्वारे घराचे मंदिर बनवते ! – श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ, सनातन संस्था
महाराष्ट्र लोक आयुक्त कार्यालयात १४३ पदांच्या सुधारित आकृतीबंधाला मान्यता !
‘वन्दे मातरम्’ गीताचा धगधगता इतिहास आता नाशिकमध्ये !