घटनास्थळी पोलीस विलंबाने पोचल्याचा गोरक्षकाचा आरोप
उत्तरप्रदेशमध्ये भाजपचे सरकार असतांना आणि गोहत्याबंदी कायदा असतांनाही गोहत्या होतात अन् ते रोखण्यास पोलीस अपयशी ठरतात, हे हिंदूंना अपेक्षित नाही. सरकारने अशा घटनांची गंभीर नोंद घेऊन कठोर उपाययोजना केली पाहिजे ! – संपादक
मथुरा (उत्तरप्रदेश) – येथील गोविंदनगरमधील कसाईपाडा येथे एका घरामध्ये गोवंशांची हत्या केली जात असल्याची माहिती गोरक्षकांना मिळाल्यावर ते येथे पोचले. तेव्हा धर्मांध कसाई आणि गोरक्षक यांच्यात वाद होऊन त्यातून कसाई आणि येथील अन्य धर्मांधांनी गोरक्षकांवर दगडकेक केली. यात काही गोरक्षक घायाळ झाले, तर ४ जणांना धर्मांधांनी पकडून ठेवले. नंतर पोलिसांनी त्यांची सुटका केली. या घटनेचे फेसबूकवरून थेट प्रक्षेपण देवराज पंडित या गोरक्षकाने केले होते. ही घटना ६ मार्चच्या सकाळी घडली. या प्रकरणी पोलिसांत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. यातील मुख्य आरोपीचे नाव रोहित उपाख्य बाबूलाल आहे. तो हिंदु नसून मुसलमान आहे.
अब्बा का नाम शहीद, बेटे का नाम बाबूलाल: मथुरा में गौरक्षकों पर हमला, एक घर में गाय काटने की सूचना पर गए थे कसाईपाड़ा#Mathura https://t.co/6GhxEUQEBa
— ऑपइंडिया (@OpIndia_in) March 7, 2022
घटनास्थळी पोलीस विलंबाने पोचत असल्याने गोहत्या होते ! – गोरक्षकाचा आरोप
गेल्या मासाभरात येथे गोवंशियांची हत्या होण्याची ही तिसरी घटना आहे, असे गोरक्षक रविकांत शर्मा यांनी सांगितले. शर्मा यांनी आरोप केला की, पोलिसांना गोहत्येविषयीची माहिती दिल्यावर ते ४५ मिनिटांनी घटनास्थळी पोचतात. वास्तविक पोलिसांनी १० मिनिटांत पोचण्याचे आश्वासन दिलेले असते. पोलीस येईपर्यंत गोहत्या झालेली असते.