सुश्री (कु.) कला खेडेकर यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठलेल्या भावसोहळ्याचे कु. मधुरा भोसले यांनी रामनाथी येथील सनातनच्या आश्रमातून केलेले सूक्ष्म परीक्षण !

‘७.२.२०२२ या दिवशी पू. नीलेश सिंगबाळ यांच्या फोंडा येथील निवासस्थानी एका अनौपचारिक कार्यक्रमामध्ये श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्या सासूबाई आणि पू. नीलेश सिंगबाळ यांच्या आई श्रीमती सुधा सिंगबाळ (वय ८२ वर्षे) यांनी संतपद प्राप्त केल्याचे घोषित करण्यात आले. या मंगल प्रसंगी सिंगबाळ कुटुंबाचे दायित्व सांभाळणार्‍या आणि पू. सिंगबाळआजी यांची मनोभावे सेवा करणार्‍या सुश्री (कु.) कला खेडेकर यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठल्याचे श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी घोषित करून त्यांचा सत्कार केला. तेव्हा मी रामनाथी येथील सनातनच्या आश्रमामध्ये होते. तेव्हा देवाच्या कृपेने या कार्यक्रमाचे माझ्याकडून झालेले सूक्ष्म परीक्षण पुढीलप्रमाणे आहे.

सुश्री (कु.) कला खेडेकर

१. सुश्री कला खेडेकरताई यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये

अ. कलाताईंनी पू. आजींची सेवा निरपेक्ष भावाने आणि मनापासून केल्यामुळे त्यांची कर्मयोगानुसार साधना झाली. कलाताईंनी संपूर्ण सिंगबाळ कुटुंबाचे दायित्व घेऊन कुटुंबियांशी संबंधित असणारी सेवा नेतृत्व घेऊन आणि परिपूर्ण केल्यामुळे त्यांची कर्मयोगानुसार साधना झाली आहे.

आ. कलाताईंनी पू. आजींची सेवा भावपूर्णरित्या आणि प्रेमाने केल्यामुळे त्यांची भक्तीयोगानुसार साधना झाली आहे.

इ. कलाताईंच्या मनामध्ये परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती निस्सीम भाव आणि अढळ श्रद्धा असल्यामुळे त्यांच्यावर श्रीगुरूंची कृपा झाल्यामुळे त्यांची गुरुकृपायोगानुसार आंतरिक साधना चालू आहे.

(‘हो. कलाताईचा प.पू. डॉक्टरांप्रती पुष्कळ भाव आणि श्रद्धा आहे.’ – श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ)

ई. कलाताई सिंगबाळ कुटुंबियांच्या घरी असल्या, तरी ‘त्या सनातनच्या रामनाथी आश्रमात राहून साधना करत आहेत’ , या भावाने सेवा करत असल्यामुळे त्यांच्याकडून भावपूर्णरित्या व्यष्टी-समष्टी साधना झालेली आहे.

(‘ती रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात राहून साधना करत आहे’, असा विचार तिच्या मनात असतो का ? हे तिला लक्षात येत नाही; पण घरी प्रत्येक सेवा करत असतांना ती आश्रमासारखे नीटनेटकी आणि परिपूर्ण करण्याचा तिचा प्रयत्न असतो.’ – श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ)

कु. मधुरा भोसले

२. कलाताईंची भावपूर्ण साधना आणि सेवा यांमुळे देवाने त्यांच्यावर कृपा करून त्यांना जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त केलेले असणे

कलाताईंमधील विविध गुण, सेवा आणि साधना करत असतांना त्यांच्या मनातील भगवंताप्रतीचा समर्पणभाव आणि भगवत्सेवेची तीव्र तळमळ या गुणांच्या आधारे त्यांची आध्यात्मिक उन्नती होऊन त्यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून त्या जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त झाल्याचे देवानेच घोषित करायला सांगितले.

३. कलाताईंनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी घोषित केल्यावर सूक्ष्म स्तरावर जाणवलेली सूत्रे

अ. कलाताईवर श्रीगुरूंच्या कृपेचा चैतन्यदायी पिवळसर रंगाचा प्रकाशझोत पडला आणि त्यांची आज्ञा अन् अनाहत ही कुंडलिनीचक्रे जागृत झाली.

आ. कलाताईंच्या हृदयात श्रीकृष्णाप्रती भक्ती असल्यामुळे त्यांच्या हृदयात निळसर रंगाचे भक्तीकमळ उमलले. या भक्तीकमळाचा आकार कृष्णकमळाप्रमाणे असून त्यातून मंद आणि गोडसर दिव्य गंध येत होता.

इ. आध्यात्मिक पातळी घोषित झाल्यावर त्यांचा श्रीगुरूंप्रतीचा भाव जागृत झाला. तेव्हा त्यांच्या हृदयातून कृतज्ञताभावाच्या निळसर रंगाच्या शीतल लहरींचे प्रक्षेपण होऊन वातावरण भावमय झाले आणि सर्वांचा श्रीगुरूंप्रतीचा कृतज्ञताभाव जागृत झाला.

कृतज्ञता

‘श्रीगुरूंच्या कृपेमुळे सुश्री (कु.) कला खेडेकरताईंच्या आध्यात्मिक उन्नतीच्या भावसोहळ्याचे सूक्ष्म परीक्षण करण्याची सेवा मिळाली आणि तो दिव्य सोहळा अनुभवण्याची संधी मिळाली अन् कृपाळू गुरुमाऊलीच्या प्रीतीची प्रचीती आली’, यासाठी मी कृपाळू श्रीगुरूंच्या चरणी कोटीश: कृतज्ञ आहे.’

– कु. मधुरा भोसले (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान), (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के) सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (८.२.२०२२)

सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात