
नांदेड – येथील विष्णुपुरी गावातील श्री काळेश्वर महादेव मंदिर येथे सनातन संस्थेच्या वतीने सात्त्विक उत्पादने आणि ग्रंथ यांचे प्रदर्शन लावण्यात आले होते. या प्रदर्शनाला अनेक मान्यवरांनी भेटी दिल्या. श्री काळेश्वर महादेव मंदिराचे सचिव श्री. बालाजी हंबर्डे यांनी ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादन यांच्या प्रदर्शनाचे दीपप्रज्वलन केले, तर विष्णुपुरी गावचे सरपंच विलास हंबर्डे यांनी सनातन संस्थेच्या ग्रंथाचे (ज्ञानगंगेचे) पूजन केले. या वेळी नांदेड शहराचे पालकमंत्री आणि राज्याचे महसूलमंत्री अशोकराव चव्हाण यांना ‘सण उत्सव साजरे करण्यामागील शास्त्र’ हा ग्रंथ भेट देण्यात आला. माजी खासदार अन् काळेश्वर देवस्थानचे अध्यक्ष भास्करराव खतगावकर, तसेच नांदेड दक्षिण मतदारसंघाचे मोहनराव हंबर्डे यांनी प्रदर्शनाला भेट दिली.
अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या प्रकरणी तरुणाला पोलीस कोठडी
दोडामार्गमध्ये गायरान भूमीवर काळ्या दगडाच्या खाणीला ग्रामस्थांचा विरोध !
सरकारने देयके संमत न केल्याने प्राणी कल्याण संस्थेकडून भटक्या कुत्र्यांचा नसबंदी कार्यक्रम बंद
मोरजी (गोवा) येथे अनधिकृत बांधकाम पाडण्याच्या कारवाईच्या वेळी अधिवक्ता आणि तक्रारदार यांच्यावर जीवघेणे आक्रमण
साधकांना सूचना : सनातन संस्थेच्या नावाने येणार्या फसव्या ई मेलपासून सावध रहा !
अग्नीसुरक्षेचे नियमभंग करणारी भिवंडी येथील २ औद्योगिक आस्थापने ‘सील’ !