

कोल्हापूर, २२ फेब्रुवारी (वार्ता.) – पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी २२ फेब्रुवारी या दिवशी कोल्हापूर येथे श्री महालक्ष्मीदेवी आणि नृसिंहवाडी येथे दत्त दर्शन घेतले.
सौजन्य साम टीव्ही
आदित्य ठाकरे यांनी नृसिंहवाडी येथे श्री चरणांचे दर्शन घेऊन श्रींना अभिषेक आणि आरती करून प्रार्थना केली. या प्रसंगी ठाकरे यांनी येथील भक्तगण, ग्रामस्थ आणि व्यापारी यांच्या समवेत संवाद साधला. या वेळी सरपंच पार्वती कुंभार, उपसरपंच रमेश मोरे यांनी मंत्री ठाकरे यांचे पुष्पगुच्छ देऊन श्री दत्त नगरीत स्वागत केले, तसेच श्री क्षेत्र नृसिंहवाडी ग्रामपंचायतीच्या वतीने विकासासंबंधी निवेदन दिले. या वेळी दत्त देव संस्थानचे अध्यक्ष सदाशिव जेरे पुजारी, सचिव संजय नारायण पुजारी, शिवसेना जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव, शिरोळ तालुकाप्रमुख वैभव उगळे यांसह अन्य उपस्थित होते.
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १८.०७.२०२६)
जुन्नरमध्ये २७० किलो गोमांसासह ३ धर्मांधांना अटक, मुख्य आरोपी पसार
हिंदु धर्मातून ख्रिस्ती होणार्यांना अनुसूचित जमातीच्या सवलतींसाठी महाराष्ट्रात समिती स्थापन !
पाश्चात्त्य संगीत कार्यक्रमातील तरुणाचा मृत्यू अमली पदार्थ सेवनानेच
शिक्षण संचालनालयाकडून ‘एस्.आय.ओ.’च्या विरोधातील मार्गदर्शक तत्त्वांचे परिपत्रक मागे
‘एस्.एन्.डी.टी. महिला विद्यापिठा’च्या कारभाराची चौकशी होणार !