बेंगळुरू (कर्नाटक) – कर्नाटक सरकारने आता अल्पसंख्यांकांच्या शाळांमध्येही हिजाबवर बंदी घालण्याचा आदेश दिला आहे. राज्यातील मौलाना आझाद आदर्श इंग्रजी माध्यमाच्या शाळांसह अल्पसंख्यांक कल्याण विभागाद्वारे चालवल्या जाणार्या शाळांत शिकणार्या विद्यार्थिनींना हिजाब घालण्यास मनाई करण्यात आली आहे. यापूर्वी सरकारने सरकारी शाळा आणि महाविद्यालये येथे हिजाब घालून येण्यास बंदी घातली होती.