कोरोनावर मात केलेल्यांपैकी १ कोटी लोकांना मानसिक विकार

वॉशिंग्टन (अमेरिका) – जगभरात आतापर्यंत ४१ कोटी ८० लाख लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. त्यांतील १ कोटी ४८ लाख लोकांना आता मानसिक विकार झाले आहेत, असे एका अभ्यासातून समोर आले आहे. या लोकांना चिंता, निराशा, झोप न येणे आदी विकार झाले आहेत. ‘ही संख्या अधिक असू शकते’, असे वॉशिंग्टन विश्‍वविद्यालयातील शास्त्रज्ञ अल् एली यांनी म्हटले आहे.

वॉशिंग्टन विश्‍वविद्यालयातील शास्त्रज्ञ अल् एली

कोरोना न झालेल्यांच्या तुलनेत कोरोना झालेल्या लोकांमध्ये मानसिक विकार निर्माण होण्याची शक्यता ६६ टक्के दिसून आली. मानसिक विकार झालेले ३४ टक्क्यांहून अधिक जण अफूचा वापर करण्यात आलेल्या औषधांचे व्यसन करू लागण्याची शक्यता असल्याचे लक्षात आले आहे. मद्य किंवा अन्य कोणत्याही अमली पदार्थाचे व्यसन होण्याची शक्यता २० टक्के दिसून आली आहे. तसेच ४७ टक्के लोकांमध्ये आत्महत्येचा विचार करण्याचीही शक्यता आहे. यामुळे या संदर्भातील औषधांची विक्रीही वाढल्याचे दिसून आले आहे, असे अभ्यासातून समोर आले आहे.