टीप : मौलवी म्हणजे इस्लामचा धार्मिक नेता
‘भारतातील मुसलमान असुरक्षित आहेत’, अशा बोंबा मारणारे निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी यांचा चमू यावर काही बोलेल का ? – संपादक

कर्णावती (गुजरात) – येथे २५ जानेवारी या दिवशी किशन बोलिया या हिंदुत्वनिष्ठाची हत्या केल्याच्या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत तिघांना अटक केली आहे. त्यात एका मौलवीचा समावेश आहे. या हत्येमध्ये एकूण दोघा मौलवींची नावे समोर आली आहेत. मुंबईच्या मौलवीने हत्येचा आदेश दिला होता, तर कर्णावतीच्या मौलवीने आरोपींना शस्त्र पुरवले होते. कर्णावतीच्या मौलवीला अटक करण्यात आली आहे. किशन यांनी सामाजिक माध्यमांमध्ये महंमद पैगंबर यांचा एक व्हिडिओ अपलोड केला होता. त्यावरून त्यांना ठार मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या होत्या.
गुजरातचे गृहराज्यमंत्री हर्ष संघवी यांनी किशन बोलिया यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले. या वेळी पत्रकारांशी बोलतांना संघवी म्हणाले की, आम्ही किशन यांच्या कुटुंबाला न्याय दिल्याविना रहाणार नाही. किशन यांची हत्या करण्यास २० वर्षांच्या दोघा आरोपींना मौलवीने प्रेरित केले होते. मौलवींचे काम लोकांना योग्य मार्ग दाखवण्याचे असते; मात्र त्यांनी हत्येसाठी शस्त्र पुरवली, हे आश्चर्यकारक आहे.
अभिनेते आमिर खान यांच्या सावत्र भावावर त्याच्या पूर्व पत्नीकडून गंभीर आरोप !
Uttarakhand Ghar Wapsi : उत्तराखंडमध्ये थारू जमातीच्या ३६ कुटुंबांतील १०६ जणांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश
गोहत्येच्या प्रकरणी ३ मुसलमानांना प्रत्येकी १० वर्षांच्या कारावासाची शिक्षा
‘एस्.आय.आर्.’ प्रक्रिया करण्यार्या शिक्षकाला ३ धर्मांधांकडून मारहाण !
अयोध्या : पवित्र शरयू नदीत मटण आणि मद्य यांची मेजवानी करणार्या तिघा हिंदूंना अटक !
श्रीरामांचा अवमान केल्यामुळेच कट्टर शहरी नक्षलवादी अभिजीत दिपके यांच्यावर शाई फेकली ! – Barkha Trehan