सनातनच्या ग्रंथभांडारमध्ये ज्ञानयोगाच्या संदर्भातील ग्रंथ नसण्याचे कारण

परात्पर गुरु डॉक्टरांचे साधनेविषयक मार्गदर्शन !

परात्पर गुरु डॉ. आठवले

‘साधना करणार्‍यांमध्ये सर्वसाधारणतः गुरुकृपायोग, भक्तीयोग आणि कर्मयोग या साधनामार्गांनुसार साधना करणार्‍यांची संख्या अधिक असते. गुरुकृपायोगानुसार साधना करणार्‍या साधकांच्या संख्येचा विचार केला, तर या साधनामार्गानुसार साधना करून डिसेंबर २०२१ पर्यंत ११८ साधक संत झाले आहेत, तर सहस्रो साधक जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त झाले आहेत. याच कारणास्तव सनातनच्या आजवरच्या ३५० ग्रंथांमध्ये बहुतांश ग्रंथ गुरुकृपायोगानुसार साधना करण्याच्या संदर्भातील आहेत. ज्ञानयोगाच्या संदर्भातील ग्रंथांचा लाभ फारच थोड्यांना होत असल्याने सनातनने ते ग्रंथ प्रकाशित केलेले नाहीत. सनातनमध्ये जे १ – २ टक्के साधक ज्ञानयोगानुसार साधना करतात, त्यांच्यासाठी ज्ञानयोगावर आधारित ग्रंथ पुढील काळात प्रकाशित करण्यात येतील. या संदर्भातील लिखाणही सनातनच्या संग्रही आहे.’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले (३.१.२०२२)