(म्हणे) ‘हिंदूंच्या कार्यक्रमाला अनुमती दिली, तर अशी स्थिती निर्माण करू की, संभाळणे कठीण होईल !’

  • पंजाबचे माजी पोलीस महासंचालक महंमद मुस्तफा यांची गरळओक

  • भाजप, काँग्रेस आणि आम आदमी पक्ष यांच्याकडून मुस्तफा यांच्यावर कारवाईची मागणी

  • राज्यात काँग्रेसचेच सरकार आहे, तर काँग्रेसने तात्काळ गुन्हा नोंदवून मुस्तफा यांना कारागृहात डांबले पाहिजे ! – संपादक
  • धर्मसंसदेत कथित आक्षेपार्ह विधाने केल्यावरून उत्तराखंडमधील भाजप सरकार हिंदूंचे महंत आणि नेते यांना अटक करून कारागृहात डांबते; मात्र पंजाबचे काँग्रेस सरकार हिंदूंच्या विरोधात दंगली घडवण्यासारखी विधाने करणार्‍या धर्मांधांना हात लावत नाही, हे लक्षात घ्या ! – संपादक
  • असे धर्मांध पोलीस अधिकारी पदावर असतांना ते हिंदूंशी कसे वागले असतील, याचा विचारच न केलेला बरा ! याचीही चौकशी झाली पाहिजे ! – संपादक
पंजाबचे माजी पोलीस महासंचालक महंमद मुस्तफा

चंडीगड – मी अल्लाची शपथ घेऊन सांगतो की, हिंदूंच्या कार्यक्रमाला अनुमती दिली जात असेल, तर आम्ही अशी स्थिती निर्माण करू की, ती संभाळणे कठीण होईल. मी एक धार्मिक सैनिक आहे. रा.स्व. संघाचा दलाल नाही की, भीतीपोटी घरात लपून बसीन. जर यांनी अशी कृती केली, तर अल्लाची शपथ त्यांना घरात जाऊन मारीन. मी आज केवळ चेतावणी देत आहे. मी मतांसाठी निवडणूक लढवत नाही, तर धर्मासाठी लढत आहे, असे विधान पंजाबचे माजी पोलीस महासंचालक आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नवजोत सिंह सिद्धू यांचे सल्लागार महंमद मुस्तफा यांनी मालेरकोटला येथे एका कार्यक्रमात केले. या विधानाचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाल्यावर भाजपने निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याचे सांगितले आहे. यासह राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडवून दंगल घडवण्याचा प्रयत्न केल्यावरून मुस्तफा यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्याची मागणी भाजपने केली आहे. काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी, राहुल गांधी, मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी आणि नवजोत सिंह सिद्धू यांनी याविषयी उत्तर दिले पाहिजे, अशी मागणीही भाजपने केली आहे. आम आदमी पक्षानेही मुस्तफा यांच्यावर टीका केली आहे.

काँग्रेसनेही मुस्तफा यांच्या विधानाला विरोध केला आहे. काँग्रेसचे खासदार  रवनीत बिट्टू यांनी ट्वीट करून म्हटले की, अशी विधाने सहन केली जाऊ शकत नाही. मुस्तफा यांनी क्षमा मागितली पाहिजे.