हा इम्रान खान यांचा ‘नवीन पाकिस्तान’ आहे का ? – रेहम खान

इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या घटस्फोटित पत्नी रेहम खान यांच्या वाहनावर काही अज्ञातांनी गोळीबार केला. यात त्या बचावल्या. रेहम खान यांनी ट्वीट करून माहिती देतांना सांगितले, ‘मी माझ्या पुतण्याच्या विवाहाला गेले होते. तेथून परत येत असतांना काही लोकांनी माझ्या वाहनावर गोळीबार केला, तसेच २ मोटारसायकल स्वारांनी बंदुकीच्या जोरावर माझी चारचाकी थांबवण्याचा प्रयत्न केला. गाडीमध्ये माझे सुरक्षारक्षक आणि वाहनचालक होते. हा इम्रान खान यांचा ‘नवीन पाकिस्तान’ आहे का ? भ्याड, लुटारू आणि लोभी लोकांच्या देशात आपले स्वागत आहे !’
Imran Khan’s ex-wife Reham slams Pak PM after alleged attack: ‘Welcome to state of thugs’ https://t.co/Tgh9OtMSoB
— Republic (@republic) January 3, 2022
रेहम खान यांनी पुढे म्हटले, ‘मला एखाद्या सामान्य पाकिस्तानी नागरिकाप्रमाणे पाकिस्तानात जगायचे आणि मरायचे आहे. या आक्रमणाला सरकार उत्तरदायी आहे. मी माझ्या देशासाठी गोळी खाण्यासही सिद्ध आहे.’
Arunachal Pradesh Intrusion : चीन सैन्याने अरुणाचल प्रदेशामध्ये घुसखोरी करून भूमी बळकावली ! – आदिवासी समुदायाचा दावा
Pakistani Soldiers Loot POK : पाकिस्तानच्या सैनिकांनी पाकव्याप्त काश्मीरमध्ये पेट्रोलपंप लुटला !
US-Iran War : अमेरिका आणि इराण यांची एकमेकांवरील आक्रमणे थांबवण्याची सिद्धता
Iran Nuclear Bomb : इराणच्या स्वसंरक्षणासाठी अणूबाँब बनवण्याला पर्याय नाही !
Kota Conversion Racket : कोटा (राजस्थान) येथे हिंदु महिलांचे धर्मांतर आणि लैंगिक शोषण होत असल्याचे उघड
कराचीमधील आक्रमणामागे हात असल्याचा आरोप भारताने फेटाळला !