मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘भाजपला पैसे द्या’, असे आवाहन करणे योग्य नाही; कारण पंतप्रधान हे देशाचे असतात. ते कोणत्या एका पक्षाचे नसतात. ते देशाचे सेवक असतात, असे मत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे.
संजय राऊत पुढे म्हणाले की, ‘भाजपला देणगी द्या, त्यामुळे देश बलाढ्य होईल’, या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वक्तव्यावर आक्षेप घेतला जाऊ शकतो. मोदी यांनी केलेल्या वक्तव्यामुळे देशात संभ्रम निर्माण झाला आहे. भाजपला पैसा दिल्याने देश कसा मजबूत होईल ? ‘देणग्या द्या’, असे म्हणणे हा भाजपचा उद्योगपतींना संदेश आहे. पंतप्रधानांनी देशाविषयी बोलले पाहिजे.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा किंवा राज्यांमधील इतर सदस्य यांनी देणगी देण्याचे आवाहन केले असते, तर वेगळी गोष्ट होती; पण पंतप्रधानांनी असे आवाहन करणे योग्य नाही, असे राऊत या वेळी म्हणाले.
‘एकादश तीर्थयात्रा’ योजनेचा आजपासून खांडोळा येथून शुभारंभ होणार
‘मराठी अभ्यास केंद्रा’ची मराठी शाळांतील इंग्रजी बालवाड्यांविरुद्ध बैठक !
मुंबई-अहमदाबाद महामार्गावरून गोमांसाची तस्करी करणारे वाहन पकडले; दीड टन मांस जप्त
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पादुकांचे मुख्यमंत्र्यांनी घेतले दर्शन !
आजच्या थोडक्यात महत्त्वाच्या बातम्या (२४.७.२०२६)
हिंगणगाव-खामगाव टेक (पुणे) येथील २४ कोटी रुपयांचा पूल पहिल्याच पावसात कोसळला !