तमिळनाडूमध्ये सरकारी नोकरी मिळण्यासाठी आता तमिळ भाषेची प्रश्‍नपत्रिका सोडवणे अनिवार्य !

भाषा जपण्यासाठी तमिळनाडू सरकारने घेतलेला निर्णय महाराष्ट्रानेही घ्यावा, असेच मराठी जनांना वाटते !

चेन्नई (तमिळनाडू) – तामिळनाडू सरकारने सरकारी नोकरी मिळण्यासाठी परीक्षा देणार्‍या परीक्षार्थींना आता तमीळ भाषेची प्रश्‍नपत्रिका सोडवणे अनिवार्य केले आहे. या परीक्षेत अनुत्तीर्ण झाल्यास परीक्षार्थींच्या अन्य उत्तरपत्रिका तपासल्या जाणार नाहीत, असे सरकारने आदेशात स्पष्ट केले आहे.