वैचारिक आतंकवाद : हिंदु धर्मावरील सर्वाधिक मोठे आक्रमण !

‘हिंदूंना वाईट किंवा आतंकवादी ठरवण्याचा जागतिक स्तरावर प्रयत्न चालू आहे. असे होणे हे हिंदूंच्या विरोधातील एक षड्यंत्रच आहे. विविध नियतकालिके, सामाजिक माध्यमे, दूरचित्रवाहिन्या आदी व्यासपिठांवरून हिंदूंची नकारात्मक प्रतिमा निर्माण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला जात आहे. याविषयी हिंदूंनी जागृत राहून या वैचारिक आतंकवादाला तेजस्वी विचारांनी प्रत्युत्तर दिले पाहिजे.’

अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर

१. वैचारिक आतंकवादाची उदाहरणे

१ उ. पाकिस्तानी हिंदू : जेव्हा आम्ही पाकिस्तानी हिंदूंच्या वेदना पाहून त्यांच्या अन्यायाच्या विरोधात बोलतो, तेव्हा विरोधक म्हणतात की, तो त्यांचा देशांतर्गत प्रश्न आहे. जेव्हा इस्रायल पॅलेस्टाईनवर आक्रमणे करतो, तेव्हा तो जागतिक मानवाधिकाराचा प्रश्न असतो आणि ‘आम्ही त्यांना साहाय्य करावे’, अशी त्यांची अपेक्षा असते.

१ ऊ. नमस्कार आणि अंधश्रद्धा : जेव्हा आम्ही एखाद्या संतांना किंवा मंदिरातील देवतेला नमस्कार करतो, तेव्हा विरोधक म्हणतात की, ही अंधश्रद्धा आहे. जेव्हा आम्ही म्हणतो की, एखाद्या नेत्याचा मुलगा, नातू, पुतण्या, भाचा आहे; म्हणून तो नेता कसा होऊ शकतो ? त्याला मते का म्हणून द्यावीत ? ‘हे नेते देश पालटतील’, असे आम्ही का म्हणून मानावे ? ४९ टक्के मते घेणारा हरतो आणि ५१ टक्के मते घेणारा निवडून येतो, हे कसे ? मग ४९ टक्क्यांवरचा हा अन्याय नाही का ? ‘अल्पसंख्यांकांना सांभाळायला पाहिजे’, असे म्हणणारे ४९ टक्क्यांना कसे सांभाळणार ? तर विरोधक म्हणतात, ‘ही अंधश्रद्धा असू शकत नाही.’

(क्रमश: पुढच्या रविवारी)

– अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर, राष्ट्रीय अध्यक्ष, हिंदु विधीज्ञ परिषद (मे २०२१)