|
जालोर (राजस्थान) – जालोर जिल्ह्यातील धुंबडिया गावात श्री हनुमान मंदिरातील ७० वर्षीय पुजारी नैनदास वैष्णव यांची अज्ञातांनी चाकूने वार करून हत्या केली. आक्रमणकर्त्यांनी त्यांच्यावर वार केल्यानंतर ते ओरडू लागल्याने शेजारील लोक धावत आले. तेव्हा आक्रमणकारी पळून गेले.
Rajasthan temple priest’s murder: Family refuses to perform last rites as protests erupt https://t.co/wNfzAtYLYJ via @TOICitiesNews pic.twitter.com/lHrYTEpNVu
— The Times Of India (@timesofindia) October 10, 2020
लोकांनी वैष्णव यांना रुग्णालयात भरती केले; मात्र तेथे त्यांचा मृत्यू झाला. पोलीस हत्या करणार्यांचा शोध घेत आहेत. ही हत्या चोरीच्या उद्देशाने झाल्याचे सांगण्यात येत आहे. नैनदास वैष्णव गेल्या ३० वर्षांपासून येथील हनुमान मंदिरात सेवा करत आहेत. तेथेच बाजूला ते झोपडी बांधून रहात होते.