रुमडामळ (मडगाव) येथे धर्मांधांकडून मोर्चा काढण्याचा प्रयत्न पोलिसांनी मान्यता न दिल्याने फसला

  • त्रिपुरामध्ये मशिदी पाडल्याच्या कथित घटनेचे प्रकरण

  • रुमडामळ परिसरात तणाव

  • पोलीस आल्यावर बंद दुकाने उघडली

प्रातिनिधिक छायाचित्र

मडगाव, १२ नोव्हेंबर (वार्ता.)  त्रिपुरा येथे मशिदी पाडल्याचा कागांवा करून रुमडामळ, मडगाव येथील धर्मांधांनी १२ नोव्हेंबर या दिवशी रुमडामळ परिसरात दुकाने बंद ठेवून मोर्चा काढून घटनांचा निषेध करण्याचे ठरवले होते. यासंबंधीचा संदेश सामाजिक माध्यमांत फिरत होता. या मोर्च्यासाठी शासनाची अनुमती घेण्यात आली नसल्याने पोलिसांनी मोर्चा काढण्यास मान्यता दिली नाही. यामुळे रुमडामळ परिसरात तणावाचे वातावरण होते. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ नये, यासाठी या ठिकाणी १०० हून अधिक पोलिसांची नेमणूक करण्यात आली होती.

धर्मांधांनी केलेल्या आवाहनासुनार रुमडामळ परिसरात १२ नोव्हेंबर या दिवशी सकाळी काहींनी त्यांची दुकाने बंद ठेवली; मात्र पोलीस घटनास्थळी पोचल्यावर सर्वांनी दुकाने उघडण्यास प्रारंभ केला. पोलिसांनी मान्यता न दिल्याने मोर्च्याचे आयोजन झाले नाही, तसेच मोठ्या प्रमाणावर पोलिसांची नेमणूक केल्याने दिवसभर रुमडामळ येथे शांततापूर्ण वातावरण होते.