१८ वर्षांपूर्वी भीतीपाटी स्वीकारला होता इस्लाम !
|
घरवापसी : घरवापसी म्हणजे मूळ हिंदु असलेल्या व्यक्तीने धर्मांतर करणे आणि कालांतराने स्वेच्छेने पुन्हा हिंदु धर्मात परत येणे
मुझफ्फरनगर (उत्तरप्रदेश) – बघरा येथे एका मुसलमान कुटुंबातील १५ लोकांनी हिंदु धर्म स्वीकारून ‘घरवापसी’ केली. त्यांनी १८ वर्षांपूर्वी भीतीपोटी इस्लाम स्वीकारला होता; परंतु आता ते परत हिंदु धर्मांत आले आहेत.
प्राप्त माहितीनुसार, हे कुटुंब बिनौली भागातील असून त्यांनी ८ नोव्हेंबर या दिवशी ‘योग साधना यशवीर आश्रमा’त जाऊन हिंदु धर्म स्वीकारण्याची इच्छा प्रदर्शित केली होती. त्यानंतर आश्रमाचे संचालक यशवीर महाराज यांनी त्यांच्याकडून शास्त्रोक्त हवनपूजा करून घेतले. पुरुषांना जानवे घालण्यात आले. सर्वांचे विधीपूर्वक शुद्धीकरण करण्यात आले. यानंतर कुटुंबातील सर्व सदस्यांची हिंदु नावे ठेवण्यात आली आणि त्यांना पुन्हा हिंदु धर्मांत सामावून घेतले. या कुटुंबात ७ महिला, ५ पुरुष आणि ३ मुली आहेत. हे कुटुंब रोजंदारी करून पोट भरते. या कुटुंबातील सदस्यांनी सांगितले की, ‘१८ वर्षांनी आम्ही हिंदु धर्मात परत आलो आहेत. आम्ही भीतीने इस्लाम स्वीकारला होता; परंतु आता स्वेच्छेने पुन्हा हिंदु धर्म स्वीकारला आहे. त्यांच्यावर कुणीही दबाव टाकला नाही.’