मद्रास उच्च न्यायालयाने सर्वोच्च न्यायालयाची मागितली क्षमा !

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतरही ६ वर्षे एक याचिका प्रलंबित ठेवल्याचे प्रकरण

देशभरातील न्यायालयांत ३ कोटींहून अधिक खटले प्रलंबित आहेत, त्याचा निपटारा करण्याचा प्रयत्न कधी होणार ? – संपादक

सर्वोच्च न्यायालय व मद्रास उच्च न्यायालय

चेन्नई (तमिळनाडू) – मद्रास उच्च न्यायालयाने एका प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाची क्षमा मागितली आहे. आर्थिक गुन्ह्यांच्या प्रकरणात सहभागी असणार्‍या महिलेकडून ३ कोटी रुपये खंडणी घेतल्याच्या प्रकरणी पोलीस अधिकार्‍यांच्या विरोधातील याचिकेवर सुनावणी करण्यास ६ वर्षे लावल्यावरून मद्रास उच्च न्यायालयाने ही क्षमा मागितली आहे. वर्ष २०१५ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने या याचिकेवर लवकरात लवकर सुनावणी करण्यास सांगितले होते; मात्र मद्रास उच्च न्यायालयाने यासाठी ६ वर्षांचा कालावधी घेतला.

उच्च न्यायालयाचे न्यायाधीश सी.व्ही. कार्तिकेयन् यांनी ही याचिका फेटाळतांना म्हटले की, उच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालयाची आशा आणि विश्‍वास यांना पात्र ठरले नाही.