
कोलकाता (बंगाल) – ट्विटरवर सक्रीय असणारे तृणमूल काँग्रेसचे नेते आणि त्यांच्या जवळच्या ‘सुप्रसिद्ध’ व्यक्तींनी बांगलादेशातील अनेक जिल्ह्यांमध्ये श्री दुर्गादेवीच्या पूजेच्या वेळी हिंदूंवर झालेल्या आक्रमणांचा साधा निषेधही नोंदवलेला नाही. तृणमूल काँग्रेस आणि विचारवंत यांच्या ढोंगीपणाचा बुरखा आता फाटला आहे. आम्हाला या आक्रमणांच्या निषेधार्थ त्यांनी कुठलाही मेणबत्ती मोर्चा काढलेला दिसला नाही, त्यांच्या दुकानातील मेणबत्त्या संपल्या होत्या का ? अशा शब्दांत भाजपचे प्रवक्ते समीक भट्टाचार्य यांनी तृणमूल काँग्रेसवर टीका केली. ते येथे एका पत्रकार परिषदेत बोलत होते.
भट्टाचार्य म्हणाले की, शेजारील देशांतील अल्पसंख्यांक नागरिकांची प्रामाणिकपणे चिंता करणारा भाजप हा एकमेव पक्ष आहे. आम्ही हिंदूंच्या धार्मिक स्थळांवर जिहाद्यांनी केलेल्या आक्रमणाचा तीव्र निषेध करतो. (केंद्रातील भाजप सरकारने बांगलादेशातील हिंदूंचे रक्षण करण्यासाठी प्रयत्न करणे हिंदूंना अपेक्षित ! – संपादक)
अभिनेते आमिर खान यांच्या सावत्र भावावर त्याच्या पूर्व पत्नीकडून गंभीर आरोप !
Uttarakhand Ghar Wapsi : उत्तराखंडमध्ये थारू जमातीच्या ३६ कुटुंबांतील १०६ जणांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश
गोहत्येच्या प्रकरणी ३ मुसलमानांना प्रत्येकी १० वर्षांच्या कारावासाची शिक्षा
‘एस्.आय.आर्.’ प्रक्रिया करण्यार्या शिक्षकाला ३ धर्मांधांकडून मारहाण !
अयोध्या : पवित्र शरयू नदीत मटण आणि मद्य यांची मेजवानी करणार्या तिघा हिंदूंना अटक !
श्रीरामांचा अवमान केल्यामुळेच कट्टर शहरी नक्षलवादी अभिजीत दिपके यांच्यावर शाई फेकली ! – Barkha Trehan