
वॉशिंग्टन (अमेरिका) – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांनी इस्रायल आणि इराण यांच्यात काही काळासाठी एकमेकांवर आक्रमण न करण्यावर सहमती झाल्याचा दावा केला आहे. प्रसारमाध्यमांशी बोलतांना त्यांनी सांगितले की, त्यांच्या मध्यस्थीमुळे पश्चिम आशियातील तणाव अल्प करण्याच्या दिशेने प्रगती झाली आहे. ट्रम्प यांच्या म्हणण्यानुसार इराणसमवेतची अणूकराराच्या विषयावरील चर्चा अंतिम टप्प्यात आली असून पुढील २-३ दिवसांत यावर महत्त्वाचा निर्णय होऊ शकतो. अंतिम करार होईपर्यंत ‘स्ट्रेट ऑफ होर्मुझ’वरील अमेरिकेची नाकाबंदी कायम राहील.
दुसरीकडे ट्युनिशियातील इराणच्या दूतावासाने ‘एक्स’वर प्रसारित केलेल्या एका चित्रामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. या चित्रामध्ये ट्रम्प हसतांना दिसत असून इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांना भिंतीवर चिकटवल्याप्रमाणे दाखवण्यात आले आहे. या चित्राखाली ‘जर तुम्हाला इराणशी व्यवहार करायचा असेल तर…’ असे लिहिण्यात आले आहे.
देशात ७६ ते ८० दिवसांचा इंधन साठा शेष ! – पेट्रोलियम मंत्री
इस्रायल आणि इराण यांच्यात काही काळासाठी एकमेकांवर आक्रमण न करण्यावर सहमती ! – Donald Trump
H-1B Visa : ट्रम्प यांनी लादलेले विदेशी कामगारांसाठीच्या ‘एच्-१बी व्हिसा’वरील शुल्क केंद्रीय न्यायालयाकडून रहित !
भारताने प्रथमच क्षेपणास्त्रांवर १२ ‘सक्रीय’ अण्वस्त्रे केली तैनात ! – SIPRI Report
भारत, रशिया आणि चीन यांच्यातील दृढ संबंध जागतिक स्थैर्यासाठी महत्त्वाचे ! – China
CJI Surya Kant : कायदेशीर व्यवसायात महिलांसाठी एक भक्कम व्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न !