ख्रिस्ती तरुणींना ‘लव्ह जिहाद’मध्ये अडकवण्यासाठी मौलवींकडून काळ्या जादूचा वापर !

केरळच्या चर्चकडून ‘लव्ह जिहाद’ च्या जागृतीसाठी प्रकाशित पुस्तिकेत माहिती

धर्मांध हे मुसलमानेतरांना ‘लव्ह जिहाद’मध्ये अडकवण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न करत आहेत. त्यामुळे ही राष्ट्रीय समस्या झाली असून त्या विरोधात हिंदूंसमवेत शीख, ख्रिस्ती, जैन अशा सर्वच पंथांतील लोकांनी संघटित होऊन ‘लव्ह जिहाद’विरोधी राष्ट्रीय कायद्याची केंद्र सरकारकडे मागणी करायला हवी ! – संपादक

थिरूवनंतपूरम् (केरळ) – येथील कोळीकोड जिल्ह्यात असलेल्या थमारसेरी शहरातील चर्चच्या कॅटेसिस विभागाने ‘लव्ह जिहाद’विषयी जागृती करण्यासाठी एक पुस्तिका प्रसिद्ध केेली आहे. यात मौलवी हे ख्रिस्ती तरुणींना ‘लव्ह जिहाद’मध्ये अडकवण्यासाठी काळ्या जादूचा वापर करतात, असे म्हटले आहे.

या पुस्तिकेमध्ये ‘लव्ह जिहाद’च्या सर्व ९ टप्प्यांची माहिती देण्यात आली आहे.  यात धर्मांध हे ख्रिस्ती तरुणींना अडकवण्यासाठी त्यांची लेखणी (पेन), रुमाल, केस आदी वस्तूंचा वापर करतात, असे म्हटले आहे.

चर्चच्या ‘लव्ह जिहाद’विषयीच्या जागृतीला धर्मांधांचा तीव्र विरोध !

विविध प्रकारच्या जिहादविषयी चर्चकडून सतत जागृती करण्यात येत आहे. त्यामुळे चर्चला तीव्र विरोधाचाही सामना करावा लागत आहे. या पुस्तिकेला धर्मांधांचा विरोध झाल्यानंतर थमारसेरी भागात असलेल्या चर्चच्या धार्मिक शिक्षण देणार्‍या विभागाचे संचालक फादर जॉन पल्लीक्कवयाल  यांनी स्पष्टीकरण देतांना म्हटले, ‘‘ही पुस्तिका ख्रिस्ती तरुण हे खिस्ती धर्मातच रहावेत, तसेच ख्रिस्ती तरुणी यांचे रक्षण होण्यासाठी सिद्ध करण्यात आली होती. या पुस्तिकेमुळे कुणाचा अपसमज झाला असेल अथवा त्यांच्या भावना दुखावल्या गेल्या असतील, तर आम्ही त्याविषयी खेद व्यक्त करतो.’’ या पुस्तिका त्वरित जप्त करण्यात याव्यात, अशी मागणी धर्मांधांच्या ‘समस्त अधिकार संरक्षण समिती’चे अध्यक्ष अब्दुल खासर यांनी केली आहे. ‘लव्ह जिहाद’चे समर्थन करतांना ते म्हणाले की, ‘इस्लाममध्ये दुसर्‍या समुदायाच्या महिलांचे लैंगिक शोषण करण्याची मान्यता देण्यात आली आहे. असे केल्याने त्यांना ‘जन्नत’ (स्वर्ग) मिळते.’ (अशा वक्तव्यातून ‘लव्ह जिहाद अस्तित्वात आहे’, हे स्वत: धर्मांधांनीच मान्य केले आहे. त्यामुळे नेहमी ख्रिस्त्यांची तळी उचलणारे निधर्मी आता धर्मांधांच्या अशा उघड षड्यंत्रांच्या विरोधात काही बोलणार का ? – संपादक)

लव्ह जिहादच्या विरोधात ख्रिस्ती धर्मगुरूंमध्ये तीव्र असंतोेष !

१. फादर जॉन पल्लीक्कवयाल यांनी दावा केला की, त्यांच्या विभागातील १६० महिलांना ‘लव्ह जिहाद’मध्ये फसवण्यात आले होते. लव्ह जिहादची तक्रार केल्यानंतर झालेल्या चौकशीमध्ये १०० हून अधिक महिलांना ‘लैंगिक आतंकवाद’च्या माध्यमातून फसवण्यात आल्याचे समोर आले होते.

२. सायरो मालाबार चर्चचे बिशप मार जोसेफ कल्लारनगट्ट यांनी अलीकडेच केरळच्या हिंदु आणि ख्रिस्ती मुलींना केवळ ‘लव्ह जिहाद’च नाही, तर ‘नार्कोटिक जिहाद’साठीही लक्ष्य करण्यात येत आहे, असे सांगितले होते. ‘नार्कोटिक जिहाद’ म्हणजे अमली पदार्थांचे व्यसन लावून तरुणींचे जीवन उद्ध्वस्त करणे होय.

३. ‘लव्ह जिहाद’च्या सूत्राकडे दुर्लक्ष केल्याने, तसेच बेपत्ता महिला अन् मुली यांच्या प्रकरणांची योग्य प्रकारे अन्वेषण न केल्याप्रकरणी केरळच्या ‘कॅथॉलिक बिशप काऊंसिल’ने राज्य अन् केंद्र सरकार यांच्यावर टीका केली होती.

४. सायरो मालाबार चर्चच्या माध्यम आयोगाने मागील वर्षी एक पत्रक प्रसिद्ध केले होते. त्यात केरळच्या ‘इस्लामिक स्टेट’मध्ये सहभागी झालेल्या २१ महिलांपैकी १० हून अधिक महिला या ख्रिस्ती समाजाच्या असल्याचे म्हटले होते.