झारखंड येथे धर्मांतरित कुटुंबातील व्यक्तीचा मृतदेह स्मशानभूमीमध्ये पुरण्यास गावकर्‍यांचा विरोध !

हिंदुद्वेषी झारखंडी मुक्ती मोर्चा सत्तेत असलेल्या झारखंड हिंदूंच्या धर्मांतराचा अड्डा बनला आहे. ख्रिस्ती प्रचारक प्रलोभने दाखवून आणि फूस लावून आदिवासींचे धर्मांतर करतात. त्यामुळे प्रथा परंपरा पाळणारे मूळ आदिवासी आणि त्यांना तुच्छ लेखणारे धर्मांतरित आदिवासी यांच्यात संघर्ष निर्माण होणे, स्वाभाविक आहे. त्यामुळे धर्मांतर हा गुण्यागोविंदाने नांदणार्‍या भारतीय समाजाला लागलेला एक कर्करोग आहे. तो अधिक पसरण्यापूर्वी केंद्र सरकारने धर्मांतरविरोधी कायदा करणे आवश्यक आहे ! – संपादक

रांची (झारखंड) – पश्‍चिम सिंहभूममधील दुरुला गावामध्ये एका धर्मांतरित आदिवासी कुटुंबात एका व्यक्तीचा मृत्यू झाला. त्यानंतर आदिवासी समाजाने त्यांच्या ससन दिरी स्मशानभूमीमध्ये हा मृतदेह पुरण्यास विरोध केला. शेवटी पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर त्या कुटुंबाच्या घराच्या अंगणामध्ये मृतदेह पुरण्यात आला.

१४ सप्टेंबर या दिवशी ही घटना घडल्याचे समजते. संबंधित कुटुंबाने मृतदेह पुरण्यासाठी तेथील ‘हो’ समाजाच्या ससन दिरी स्मशानभूमीमध्ये खड्डा खोदण्यास प्रारंभ केला. तेव्हा अन्य आदिवासी लोकांनी त्यांना थांबवले. याविषयी गावकर्‍यांनी आदिवासी ‘हो’ समाज युवा महासभेच्या लोकांना सूचना दिली. त्यानंतर गावामध्ये एक बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये ‘संबंधित कुटुंबातील मृतदेहाला स्मशानभूमीमध्ये पुरता येणार नाही’, असा निर्णय झाला. हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोेचले. पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर धर्मांतरित कुटुंबाने त्यांच्या घराच्या अंगणात मृतदेह पुरण्याचा निर्णय घेतला. ‘हो’ समाजाच्या मते, आदिवासी कुटुंबाने धर्मांतर केल्यानंतर त्याच्या कुटंबातील व्यक्तीच्या मृतदेहाला समाजाच्या ससन दिरी स्मशानभूमीमध्ये पुरता येणार नाही.