५ घंट्यांनंतर आगीवर नियंत्रण

पुणे – बावधन बुद्रुक येथील ‘ऑनलाईन’ किराणा माल विकणार्या ‘बिग बास्केट’च्या गोदामाला १२ सप्टेंबरच्या मध्यरात्री भीषण आग लागली. या आगीत गोदामाची मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे. घटनेची माहिती मिळताच अग्नीशमन दलाच्या कर्मचार्यांनी आगीवर नियंत्रण आणण्याचे काम चालू केले. ५ घंट्यांनंतर आगीवर नियंत्रण मिळवता आले. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. आगीत कोट्यवधी रुपयांचे धान्य, भाज्या आणि किराणा माल जळून खाक झाला आहे. विशेष म्हणजे आगीत गोदामातील लाखो रुपयांची रोकडही जळून गेली आहे. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.
स्मार्ट वीजमीटरला विरोध करणार्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न ! – सिंधुदुर्ग वीज ग्राहक संघटना, दोडामार्ग शाखा
पुणे महानगरपालिकेत बनावट नियुक्तीपत्रांच्या माध्यमांतून आर्थिक फसवणूक !
लोहियानगर (पुणे) येथील आधुनिक वैद्यांनी पिस्तुल दाखवून दिली जिवे मारण्याची धमकी !
मुंबई, पुणे आणि नागपूर यांसह अनेक शहरांत तरुणांचे आंदोलन !
सातारा निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांना काही युवकांकडून मारहाण
प्रश्नपत्रिका फुटीचे सरकार दायित्व घेते आणि ते निश्चितही करते ! – सचिंद्र प्रताप सिंह, शिक्षण आयुक्त