‘लव्ह जिहाद’ आणि ‘नार्कोटिक जिहाद’ यांच्या विरोधात आवाज उठवणार्‍या  बिशपच्या विरोधात धर्मांध संघटनांची निदर्शने

बिशप यांनी थेट धर्मांधांवर टीका केल्याने त्यांना मिरच्या झोंबल्या आहेत आणि त्यातून त्यांनी विरोध करण्यास चालू केले आहे ! याला म्हणतात ‘चोराच्या उलट्या बोंबा !’ – संपादक

‘नार्कोटिक जिहाद’ म्हणजे काय ?

मुसलमानेतर तरुण-तरुणींना अमली पदार्थ सेवन करण्याचे व्यसन लावून त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त केले जाते. अशा प्रकारे शस्त्रांविना मुसलमानेतरांची युवा पिढी संपवली जाते. जिहादचा म्हणजे इस्लामी धर्मयुद्धाचाच हा भाग आहे.

कोट्टयम् (केरळ) – येथील सायरो मलबार चर्चचे बिशप मार जोसेफ कल्लारनगट्ट यांनी ‘ख्रिस्त्यांना ‘लव्ह जिहाद’ आणि ‘नार्कोटिक जिहाद’ यांद्वारे जाळ्यात ओढण्यात येत आहे’, असे विधान केले होते. याचा विरोध करण्याताठी मुसलमानांनी बिशप (चर्चमध्ये वरच्या श्रेणीत कार्यरत असलेले पाद्री) कल्लारनगट्ट यांच्या घराबाहेर निदर्शने केली. ‘कोट्टायम् महल मुस्लिम कोऑर्डिनेशन कमिटी’चे २०० हून अधिक धर्मांध यात सहभागी झाले होते. तसेच बिशप यांच्या विरोधात पोलिसांत तक्रार करण्यात आली आहे.

१. भाजपने बिशप यांच्या विधानाचे समर्थन केले आहे. भाजपचे केरळ प्रदेश अध्यक्ष के. सुरेंद्रन् यांनी ‘हे एक गंभीर सूत्र असून यावर समाजाने चर्चा केली पाहिजे’, असे म्हटले आहे. (भाजपने केंद्र सरकारला याविषयी सांगून याची सखोल चौकशी करून उत्तरदायींवर कठोर कारवाई केली पाहिजे, असेच हिंदूंना वाटते ! – संपादक)

२. कॅथॉलिक संस्थांनी बिशपच्या विधानाचे समर्थन केले आहे. ख्रिस्त्यांनी म्हटले की, ‘नार्कोटिक जिहाद’चा ख्रिस्ती तरुणांवर मोठा परिणाम होत आहे. ते अमली पदार्थांचे व्यसन करू लागले आहेत. हॉटेल आणि ज्यूस सेंटर यांच्या माध्यमांतून ‘नार्कोटिक जिहाद’ चालू आहे. यामागे कट्टरतावादी जिहादी आहेत.

३.  ‘डेमोक्रेटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया’चे ए.ए. रहीम यांनी बिशपच्या विधानावर ‘दुर्दैवी आणि योग्य माहितीविना केलेले विधान’ असे म्हटले आहे.

४.  ‘केरळ प्रदेश काँग्रेस कमिटी’चे अध्यक्ष पी.टी. थॉमस यांनीही टीका करतांना ‘अशी विधाने समाजातील वातावरण बिघडवू शकतात’, असे म्हटले आहे. (‘समाजात जे चालू आहे, ते स्पष्टपणे मांडणे म्हणजे वातावरण बिघडवणे’ असे काँग्रेसला वाटत असेल, तर याचा अर्थ ‘समाजाने अन्याय सहन करावा’, असेच काँग्रेसला वाटते का ? थॉमस ख्रिस्ती असूनही ते बिशप यांच्या विधानाशी सहमत नसणे हा ते काँग्रेसमध्ये असल्याचा परिणाम आहे, असे जनतेला वाटते ! – संपादक)

(म्हणे) ‘एखाद्या समस्येसाठी एखाद्या धर्माला लक्ष्य केला जाऊ शकत नाही !’ – केरळचे मुख्यमंत्री

केरळमधील साम्यवादी पक्षाच्या सरकारच्या मुख्यमंत्र्यांकडून  याहून वेगळी अपेक्षा काय करणार ? आतातरी ख्रिस्ती समाज साम्यवाद्यांचे खरे स्वरूप जाणेल का ? – संपादक

मुख्यमंत्री पिनराई विजयन्

केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन् यांनी बिशप मार जोसेफ कल्लारनगट्ट यांच्या विधानावर प्रतिक्रिया व्यक्त करतांना म्हटले की, बिशप एक प्रभावशाली आणि धार्मिक विद्वान आहेत. आम्ही पहिल्यांदाच ‘नार्कोटिक जिहाद’ असा शब्द ऐकत आहोत. अमली पदार्थांच्या समस्येसाठी एखाद्या धर्माला लक्ष्य केले जाऊ शकत नाही. असे करणे संपूर्ण समाजावर वाईट परिणाम करणारे आहे. यामुळे आम्ही चिंतीत आहोत. उत्तरदायी पदावरील व्यक्तीने असे विधान देतांना सतर्कता बागळली पाहिजे. धर्माच्या आधारे विभाजन होऊ शकणारी विधान देऊ नयेत. (बिशप यांनी केलेल्या विधानाची चौकशी करण्याचा प्रयत्न करू, असे विधान मुख्यमंत्री करत नाहीत, हे लक्षात घ्या ! – संपादक)