गौरी लंकेश हत्या प्रकरणातील दोषींना ‘ककोका’ कायदा आणि हिदुत्वनिष्ठांची हत्या करणार्‍यांना जामीन ! असा पक्षपात का ? – प्रमोद मुतालिक, राष्ट्रीय अध्यक्ष, श्रीराम सेना 

‘गौरी लंकेश हत्या प्रकरण – वास्तव आणि विपर्यास’ या विषयावर ‘ऑनलाईन’ चर्चासत्र

हिंदूसंघटन आणि धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राची स्थापना यांसाठी  हिंदु जनजागृती समिती

बेंगळुरू (कर्नाटक) – गौरी लंकेश हत्या प्रकरणात अटक करण्यात आलेले संशयित आरोपी निर्दाेष असून त्यांच्या मागे कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही. अशा निष्पाप लोकांवर आतंकवादी कारवायांसाठी लावण्यात येणारा ‘ककोका’ (कर्नाटक संघटित गुन्हेगारी कायदा) कायदा लावण्यात आला आहे; परंतु आतंकवादी कृत्ये करणारे, दंगली करणारे, हिंदुत्वनिष्ठांच्या हत्या करणारे धर्मांध आणि ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ (पी.एफ्.आय.) यांच्या कार्यकर्त्यांवर या कायद्याची कलमे लावण्यात आलेली नाहीत. त्यामुळे ते राजरोसपणे मोकाट फिरत आहेत.

श्री. प्रमोद मुतालिक

गौरी लंकेश हत्या प्रकरणात विशेष अन्वेषण पथक निर्माण करण्यात आले होते; परंतु २५ हिंदुत्वनिष्ठांच्या हत्येच्या प्रकरणी कोणतेही विशेष अन्वेषण पथक स्थापन करण्यात आले नाही. डीजे हळ्ळी येथील दंगल, दलित लोकप्रतिनिधीच्या घरावर धर्मांधांनी केलेले आक्रमण आणि पोलीस ठाणे जाळल्याचे प्रकरण या सर्व कृत्यांमागे आतंकवादी षड्यंत्र आहे. असे असूनही ११५ धर्मांधांना जामीन देण्यात आला आहे; परंतु गौरी लंकेश हत्या प्रकरणातील संशयितांना मात्र जामीन नाही. एवढेच नव्हे, तर गौरी लंकेश हत्या प्रकरणाची सुनावणीही व्यवस्थित होत नाही. या प्रकरणात पक्षपात करण्यात आला आहे, असे प्रतिपादन श्रीराम सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. प्रमोद मुतालिक यांनी केला. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘गौरी लंकेश हत्या प्रकरण – वास्तव आणि विपर्यास’ या विषयावर ‘ऑनलाईन’ चर्चासत्र ३१ ऑगस्ट २०२१ या दिवशी आयोजित करण्यात आले होते, त्या वेळी ते बोलत होते.

श्री. चंद्र मोगेर

या वेळी अधिवक्ता कृष्णमूर्ती पी., कर्नाटकमधील हिंदुत्वनिष्ठ श्री. एस्. भास्करन् आणि सनातन संस्थेच्या सौ. लक्ष्मी पै यांनीही या प्रकरणी भूमिका मांडली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हिंदु जनजागृती समितीचे दक्षिण कन्नड जिल्ह्याचे समन्वयक श्री. चंद्र मोगेर यांनी केले. हा ऑनलाईन कार्यक्रम ९ सहस्र ४०० जणांनी पाहिला.

भगवंताच्या कृपेने सनातन संस्थेचे कार्य प्रचंड वेगाने वाढत आहे ! – सौ. लक्ष्मी पै, सनातन संस्था

सौ. लक्ष्मी पै

सनातन संस्थेच्या सौ. लक्ष्मी पै म्हणाल्या की, गौरी हत्या प्रकरणात सनातन संस्थेवर आरोप करून त्यावर बंदी घालण्याचा प्रयत्न झाला; परंतु भगवंताच्या कृपेने सनातनच्या कार्यावर कोणताही परिणाम झाला नाही. उलट लाखो लोक सनातन संस्थेच्या मार्गदर्शनाखाली साधना करत आहेत. आताही सनातन संस्थेचे कार्य प्रचंड वेगाने वाढत आहे.

गौरी लंकेश हत्याप्रकरणी तत्कालीन काँग्रेस सरकारने केलेली कारवाई पूर्वग्रदूषितपणाची ! – भास्करन्, हिंदुत्वनिष्ठ, कर्नाटक

श्री. भास्करन्

या प्रसंगी हिंदुत्वनिष्ठ श्री. भास्करन् म्हणाले की, गौरी लंकेश नक्षलसमर्थक होत्या. त्या सातत्याने हिंदु धर्म, परंपरा आणि हिंदुत्वनिष्ठ यांच्यावर टीका करायच्या. त्या देशविरोधी बोलणारे कन्हैया कुमार, उमर खालिद यांना स्वतःची मुले मानत. गौरी लंकेश यांच्या हत्येच्या प्रकरणात तत्कालीन काँग्रेस सरकारने चौकशीला प्रारंभ करण्यापूर्वीच त्यांनी हिंदु संघटनांवर पूर्वग्रहदूषितपणे आरोप केले आणि त्याप्रमाणे चौकशीचा आव आणून हिंदुत्वनिष्ठांना संशयित म्हणून अटक केली.

अधिवक्ता कृष्णमूर्ती पी.

अधिवक्ता कृष्णमूर्ती पी. म्हणाले की, हिंदु धर्माचा सातत्याने अवमान करणारे हिंदुद्रोही कन्नड लेखक के.एस्. भगवान यांच्यावर कोणतीही कारवाई केली जात नाही. निरपराध्यांविरुद्ध षड्यंत्र रचून त्यांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न करणे, हे योग्य नाही.