
उंचगाव (जिल्हा कोल्हापूर), २५ ऑगस्ट (वार्ता.) – उंचगाव येथील निराधार महिला विमल देसाई यांचा निराधार असल्याचा अपलाभ उठवत एका महिलेने देसाई यांची २ लाख रुपयांची रक्कम व्याजाचे आमीष दाखवून हडप केली. ही घटना करवीर शिवसेना तालुकाप्रमुख राजू यादव यांना समजताच त्यांनी देसाई यांची भेट घेऊन त्यांना २ मासाचे धान्य आणि अन्य साहित्य दिले. देसाई यांना फसवणूक झालेली रक्कम परत मिळेपर्यंत करवीर शिवसेना तुमच्या पाठीशी आहे, असे श्री. राजू यादव यांनी सांगितले. या वेळी सर्वश्री दीपक रेडेकर, बाळासो नलवडे, केरबा माने, बंडा पाटील, अजित पाटील आदी उपस्थित होते. (निराधार महिलेला साहाय्य करणारे शिवसेनेचे करवीर तालुकाप्रमुख श्री. राजू यादव यांचे अभिनंदन ! – संपादक)
‘महावितरण’च्या हलगर्जीपणामुळे केडगाव (पुणे) येथे २४ वर्षीय युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू !
माळेगाव मक्ता (नांदेड) येथे वादळी वार्यामुळे १५ ते २० लाख रुपयांची हानी !
मोरबे धरणाच्या मुख्य जलवाहिनीवरील देवद-विचुंबे येथील अनधिकृत नळजोडणी खंडित !
मातृभाषेतील शिक्षणाचे महत्त्व अनन्यसाधारण ! – सुभाष शिरोडकर, मंत्री
युवतीला फूस लावून पळवून नेल्याच्या संशयाने ग्रामस्थांनी एका शिक्षकाला चोपले !
इयत्ता १० वीच्या परीक्षेतील कॉपी प्रकरणाचे मुख्य सूत्रधार मुख्याध्यापकच