लोकांच्या मानसिकतेचा अपलाभ घेणार्या आणि त्यांना लुबाडणार्या व्यक्तींना कठोरात कठोर शिक्षा व्हायला हवी ! – संपादक

नगर – श्रीगोंदा तालुक्यात ‘पैशांचा पाऊस पडेल’, तसेच ‘फुलांवर पैसे ठेवून ते दुप्पट होतील’, असे आमीष दाखवून लोकांना लुटणार्या टोळीला पकडण्यात श्रीगोंदा पोलिसांना यश आले आहे. या टोळीतील आरोपी हे पुणे जिल्ह्यातील आहेत. दत्तात्रय शेटे यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी अनोळखी आरोपींच्या विरोधात गुन्हा नोंद केला होता. या गुन्ह्याचा तपास करतांना पोलीस निरीक्षक ढिकले यांनी पथक पाठवून थेऊर येथील अशोक चव्हाण आणि संतोष देवकर यांना कह्यात घेतले असून असे प्रकार कोठे होत असल्याची माहिती मिळाल्यास पोलिसांना कळवावे, असे आवाहनही केले. या घटनेचा पुढील तपास फौजदार रणजीत करत आहेत.
जांबावली येथील देवस्थानच्या भूमीवरील ‘ध्यान फाऊंडेशन’च्या नवीन गोशाळेवर आक्रमण
चेंबूर येथे पहाटे शाळेच्या आवारात ३५ फूट उंच संरक्षक बॅरिकेड कोसळले
ठाणे महानगरपालिकेने ८ दिवसांत १ सहस्र ५२४ अनिधकृत फलक हटवले
ठाणे येथील तेलाची १९ पैकी १६ गोदामे अनधिकृत
शाळा, रुग्णालये यांसह धार्मिक स्थळांभोवतीच्या अतिक्रमणांवर ठाणे महानगरपालिकेची कारवाई
पुणे महापालिकेने १० वर्षांपूर्वी खरेदी केलेले अन्न पडताळणी यंत्र सापडले !