प्रेमविवाहाच्या नावाखाली इस्लामी वंशवृद्धी करणे, हाच ‘लव्ह जिहाद’चा उद्देश ! – मनोज खाडये, पश्चिम महाराष्ट्र, कोकण, गोवा आणि गुजरात राज्य समन्वयक, हिंदु जनजागृती समिती

प्रातिनिधिक छायाचित्र

सोलापूर – आतापर्यंतच्या हिंदु स्त्रियांनी नैतिकता आणि संस्कृती यांचा मौल्यवान ठेवा जपला आहे; मात्र ‘लव्ह जिहाद’च्या माध्यमातून हिंदु स्त्रियांना भ्रष्ट करण्याचे षड्यंत्र मोठ्या प्रमाणात वाढत आहे. प्रेमविवाहाच्या गोंडस नावाखाली हिंदु स्त्रियांचा भोगवस्तू म्हणून वापर करणे आणि इस्लामी वंशवृद्धीचा मार्ग अवलंबणे, हाच ‘लव्ह जिहाद’चा उद्देश आहे. या ‘लव्ह जिहाद’पासून रक्षण होण्यासाठी हिंदु मुलींना लहानपणापासूनच नीतीमूल्यांच्या शिक्षणासह धर्मशिक्षण दिले पाहिजे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे पश्चिम महाराष्ट्र, कोकण, गोवा आणि गुजरात राज्य समन्वयक श्री. मनोज खाडये यांनी केले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ११ ऑगस्ट या दिवशी सोलापूर, लातूर, धाराशिव आणि बीड या जिल्ह्यांतील हिंदूंसाठी ‘ऑनलाईन’ आयोजित केलेल्या ‘लव्ह जिहाद – एक भीषण समस्या आणि त्यावरील उपाय’ या विषयावर ते बोलत होते. या कार्यक्रमाचा १ सहस्रहून अधिक हिंदूंनी लाभ घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. दुर्गनाथ देशमुख यांनी केले, तर कार्यक्रमाचा उद्देश सौ. अर्चना पाटील यांनी सांगितला.

श्री. मनोज खाडये

‘लव्ह जिहाद’चे समूळ उच्चाटन करण्यासाठी इस्रायलप्रमाणे कठोर कायदे भारतात होणे आवश्यक !

पालकांनी मुलांना अनिर्बंध स्वातंत्र्य दिल्याने त्यांचे जीवन धोक्यात येत आहे. मुलींच्या भावनांचा आदर करून त्यांना भावनिक आधार देणे आवश्यक आहे. तसेच मुलींना साधना करण्यास शिकवल्यास त्यांच्यातील आध्यात्मिक सामर्थ्य वाढण्यास साहाय्य होते. ‘लव्ह जिहाद’चे समूळ उच्चाटन करण्यासाठी इस्रायलप्रमाणे कठोर कायदे भारतात होणे आवश्यक आहे. ‘माझ्या परिचयाची एकही मुलगी ‘लव्ह-जिहाद’ला बळी पडणार नाही’, असा निश्चय करा, असे आवाहन श्री. मनोज खाडये यांनी केले.

 जिज्ञासूंचे अभिप्राय

१. श्री. गणेश मेढे, नाशिक – ‘लव्ह जिहाद’ हे हिंदु समाजासमोर मोठे संकट आहे; पण दुर्दैवाने हिंदु समाज ही सत्य परिस्थिती स्वीकारण्यास अजूनही सिद्ध नाही.

२. श्री. नागनाथ घुले, सोलापूर – आजच्या कार्यक्रमात श्री. मनोज खाडये यांनी उपयुक्त आणि अचूक माहिती दिली. या व्याख्यानाच्या माध्यमातून आम्हाला ‘लव्ह जिहाद’चे परिणाम आणि त्यावरील उपाययोजना यांविषयी योग्य मार्गदर्शन लाभले.