गेल्या ३ वर्षांत पोलीस कोठडीमध्ये ३४८ जणांचा मृत्यू ! – केंद्र सरकार

या मृत्यूंमागे नेमकी कोणती कारणे होती, जर अत्याचारांमुळे हे मृत्यू झाले असतील, तर संबंधितांवर कोणती कारवाई करण्यात आली, याचीही माहिती केंद्र सरकारने जनतेला द्यायला हवी !

नवी देहली – गेल्या ३ वर्षांत कारागृहांमध्ये ३४८ बंदीवानांचा मृत्यू झाला, तर १ सहस्र १८९ जणांना मारहाण करण्यात आली, अशी माहिती लोकसभेत केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी एका प्रश्‍नाला उत्तर देतांना दिली.

राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने दिलेल्या माहितीनुसार पोलीस कोठडीमध्ये वर्ष २०१८ मध्ये १३६, वर्ष २०१९ मध्ये ११२ आणि २०२० मध्ये १०० जणांचा मृत्यू झाला. तसेच वर्ष २०१८ मध्ये ५४२, २०१९ मध्ये ४११ आणि २०२० मध्ये २३६ जणांवर जाचक अत्याचार करण्यात आले.