‘भारत के वामपंथी : चीन के गुलाम’ या विषयावर विशेष ‘ऑनलाईन’ परिसंवादाचे आयोजन !

चीन विविध माध्यमांतून भारताला हानी पोचवण्याचा प्रयत्न करत आहे. यात प्रामुख्याने वर्ष १९६२ मध्ये चीनने भारतावर केलेले आक्रमण, तसेच मागील वर्षी गलवान खोर्‍यात चीनने केलेल्या आक्रमणात अनेक सैनिकांना हुतात्मा व्हावे लागले होते. अशा चीनमध्ये होणार्‍या साम्यवादी पक्षाच्या (कम्युनिस्ट) १०० व्या वर्धापनदिनानिमित्त भारतातील कम्युनिस्ट (साम्यवादी) मोठ्या प्रमाणात सहभागी होत आहेत, तसेच प्रत्येकवेळी भारतातील कम्युनिस्ट (साम्यवादी) लोक चीनचे समर्थनच करत आहेत. भारतातील अशा कम्युनिस्ट (साम्यवादी) लोकांचे खरे रूप सर्वांसमोर यावे यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ४ ऑगस्ट या दिवशी ‘चर्चा हिन्दू राष्ट्र की…’ या विशेष ‘ऑनलाईन’ परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे.

वार, दिनांक आणि वेळ : बुधवार, ४ ऑगस्ट २०२१, सायंकाळी ७ वाजता

लाईव्ह पहाण्यासाठी भेट द्या !