जम्मू-काश्मीरमध्ये एन्.आय.ए.च्या १४ ठिकाणी धाडी

मंदिरांवर आक्रमण करण्याचे आतंकवाद्यांचे षड्यंत्र !

श्रीनगर (जम्मू-काश्मीर) – राज्यातील मंदिरांवर आक्रमणे करण्याचे षड्यंत्र रचल्याच्या प्रकरणी राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने राज्यातील १४ ठिकाणी धाडी घातल्या आहेत. गेल्या आठवड्यात पोलिसांनी दोघा आतंकवाद्यांना स्फोटकांसह अटक केली होती. त्यांनी दिलेल्या माहितीवरून अन्य दोघांना अटक करण्यात आली. त्यांच्या चौकशीतून मिळालेल्या माहितीवरून या धाडी घालण्यात आल्या आहेत. या धाडीमध्ये काय सापडले, हे अद्याप समोर आलेले नाही.