कागल तालुक्यात शिवसंपर्क अभियानास प्रारंभ
कागल, १६ जुलै (वार्ता.) – शिवसेना नेहेमीच सामान्य माणसांच्या पाठिशी उभी रहाते. सामान्यांच्या प्रश्नावर आवाज उठवणारी शिवसेना नेहेमीच त्यांचा आधार वाटते. या संपर्क अभियानाच्या माध्यमातून ‘गाव तिथे सेना’ पोचवण्याच्या दृष्टीने आपण प्रयत्न करूया, असे आवाहन शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख संभाजीराव भोकरे यांनी केले. कागल तालुक्यात करनूर, सुळकुड येथे आयोजित संपर्क अभियानात ते बोलत होते. या वेळी कागल तालुक्याचे माजी आमदार संजयबाबा घाटगे, कोल्हापूर जिल्ह्याचे शिवसेनाप्रमुख विजयराव देवणे यांसह अन्य पदाधिकारी यांनी मनोगत व्यक्त केले.
या वेळी कागल विधानसभा मतदारसंघाचे संपर्कप्रमुख दिनकरराव जाधव, कागल तालुका शिवसेनाप्रमुख शिवगोंड पाटील, अशोकराव पाटील (बेलवळेकर), भाऊसाहेब नलवडे, राजू भोसले, अरविंद चौगुले, विठ्ठल कांबळे यांसह अन्य शिवसैनिक उपस्थित होते.