सांगली, २३ जून (वार्ता.) – श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने शिवराज्याभिषेक दिन अर्थात् हिंदवी स्वातंत्र्यदिन शिवतीर्थावर मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीस ७ नद्या, ७ गड यांवरील पाणी, तसेच दूध-मध यांनी अभिषेक घालण्यात आला. श्री. अविनाश सावंत यांनी प्रस्तावना केली, तर राजेंद्र शहापुरे यांनी प्रेरणादायी गीत सादर केले. पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांनी धारकर्यांना मार्गदर्शन केले. या वेळी धारकरी सर्वश्री हणमंतराव पवार, अंकुश जाधव, राजू पुजारी, हरिदास कालिदास, नितीन काळे, प्रसाद रिसवडे, मिलिंद तानवडे यांसह धारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.