
कोल्हापूर – शिवसेनेच्या ५५ व्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने शहर शिवसेनेच्या वतीने जिलेबी आणि मास्क यांचे वाटप करण्यात आले. शिवसेनेचे शहरप्रमुख मयुर घोडके यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. शिवसेना उपजिल्हाप्रमुख शंभूराजे काटकर यांच्या हस्ते पूजन करून भगवा ध्वज फडकवण्यात आला. त्यानंतर शहरात विविध भागांमध्ये आरोग्य शिबिर आणि लहान मुलांच्या अनाथ आश्रमात जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.
या वेळी उपशहरप्रमुख राम काळे, युवा सेना सरचिटणीस राहुल यमगर, विभाग प्रमुख अमोल कांबळे, शाखाप्रमुख सूरज पवार, सुमित पवार, गुरुदत्त शेंडगे यांसह अन्य शिवसैनिक उपस्थित होते.

१. दक्षिण शिवाजीनगर जनसंपर्क कार्यालय येथे छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करून शिवसेनाप्रमुख बाळसाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या वेळी महाराष्ट्र कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष भगवानदास केंगार, उमेश मासाळ, शितल थोरवे, मुकुंद आवळे यांसह अन्य उपस्थित होते.
२. बुधगाव येथे बाळासाहेब ठाकरे चौक येथे श्री. बजरंग पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत वर्धापनदिन साजरा करण्यात आला.

लाचखोर तहसीलदार विजय चव्हाण यांच्याकडे सापडले घबाड !
‘एन्.आय.टी. गोवा’ची भरती प्रक्रिया तात्पुरती स्थगित !
थोडक्यात महत्त्वाचे : ०९.०६.२०२६
पुणे येथे पोलिसांचा गणवेश घालणार्या बनावट मुसलमान महिलेला अटक !
गोव्यातील मटका जुगाराचे अन्वेषण करणारे विशेष अन्वेषण पथक बंद करण्यास याचिकाकर्त्याचा विरोध
श्री विठ्ठलमूर्ती संवर्धनासाठी रासायनिक लेपनाला विरोधच; धर्मशास्त्रानुसार लेपन करा ! – महाराष्ट्र मंदिर महासंघ