पणजी – कायदा खात्याने ‘नॅशनल जेनरीक डॉक्युमेंट रजिस्ट्रेशन सिस्टम’ आणि विवाहाची नोंदणी ‘ऑनलाईन’ पद्धतीने करण्याची सुविधा कार्यान्वित केली आहे. याद्वारे ‘सक्सेशन’, ‘विल’ आदी ‘नोटरिअल’ सेवांसाठी शुल्क ‘ऑनलाईन’ पद्धतीने भरता येणार आहे. यामुळे ग्राहकांना रोख रक्कम हाताळावी लागणार नाही आणि ‘चलन’ भरण्यासाठी अधिकोषात रांगेत उभे रहावे लागणार नाही, अशी माहिती कायदामंत्री नीलेश काब्राल यांनी दिली.