१. कोरोनाचे नवीन रुग्ण ४६५
२. २४ घंट्यांत १३ जणांचा मृत्यू
३. मृत्यू झालेले एकूण रुग्ण ६०४
४. उपचार चालू असलेले रुग्ण ४ सहस्र ९८६
५. बरे झालेले रुग्ण १७ सहस्र २६५
६. आतापर्यंतचे एकूण रुग्ण २२ सहस्र ८६१
आचरा येथील श्री देव रामेश्वर संस्थानकडून प्राथमिक आरोग्य केंद्रास ऑक्सिजन कॉन्सेन्ट्रेटर यंत्र
मालवण – तालुक्यातील आचरा येथील इनामदार श्री देव रामेश्वर संस्थानकडून आचरा प्राथमिक आरोग्यकेंद्राला ऑक्सिजन कॉन्सेन्ट्रेटर यंत्र उपलब्ध करून देण्यात आले आहे. इनामदार श्री देव रामेश्वर संस्थानचे अध्यक्ष मिलिंद मिराशी, खजिनदार सुधीर सुखटणकर यांच्या उपस्थितीत हे यंत्र आचरा आरोग्यकेंद्राचे वैद्यकीय अधिकारी शामराव जाधव त्यांच्याकडे सुपुर्द करण्यात आले.