हिंदूंना कसेही करून पळवून लावून त्यांच्या जागा कह्यात घेण्यासाठी धर्मांध प्रयत्नशील असतात; मात्र हिंदूंना प्रशासन आणि पोलीस यांच्याकडून संरक्षण मिळत नसल्याने धर्मांधांचे फावते. यावर उपाय म्हणजे हिंदूंनी संघटित होऊन स्वत:चे रक्षण करणे आवश्यक आहे !

नागरदेवळे (नगर) – येथील ब्रह्मतळे या ठिकाणी २० वर्षांपासून रहाणार्या मागासवर्गीय हिंदु कुटुंबांना धर्मांध युवकांकडून धमकावण्याचा प्रकार घडत आहे. काही वर्षांपूर्वी या ठिकाणी धर्मांधांची संख्या अल्प होती; पण आता त्यांची संख्या वाढली असल्यामुळे त्यांनी हिंदूंना धमकावण्याचे प्रकार चालू केले आहेत. यामध्ये मुलींची छेड काढणे, बळजोरीने जागा कह्यात घेणे, दमदाटी करणे असे अपप्रकार बर्याच प्रमाणात चालू आहेत. (याचा अर्थ धर्मांध त्यांची संख्या अल्प असल्यावर गोडीगुलाबीने रहातात आणि संख्या वाढल्यावर मात्र त्यांचा रंग दाखवून गुंडगिरी करतात. धर्मांधांचे हे तंत्र ओळखून हिंदूंनी सतर्क आणि संघटित रहाणे आवश्यक आहे ! – संपादक)
१. नुकतेच येथील एका हिंदु कुटुंबाला मारहाण करण्यात आली. यामध्ये किरण गायकवाड हे गंभीररित्या घायाळ झाले आहेत. या घटनेने स्थानिक हिंदू भयभीत झाले आहेत.
२. येथे कोणतेही कारण काढून प्रत्येक वेळी जमाव जमवून मारहाण करणे, दगडफेक करणे अशा घटना वेळोवेळी घडत आहेत.
३. येथून जवळच आलमगीर ठिकाण (औरंगजेबाच्या मृत्यूचे ठिकाण) आहे. त्यामुळे या ठिकाणी धर्मांधांची संख्या अधिक आहे आणि प्रत्येक वेळी धर्मांध हे राजकीय दबाव आणून घडलेल्या घटना दडपण्याचा प्रयत्न करत आहे, अशी स्थानिक नागरिकांची तक्रार आहे.
४. तरी या घटनेची नोंद घेऊन हिंदूंवर होणारे अत्याचार आणि अन्याय प्रशासनाने त्वरित लक्ष घालून थांबवावा, अशी स्थानिक नागरिकांची मागणी आहे. (नागरिकांना अशी मागणी का करावी लागते ? पोलीस प्रशासन स्वतःहून कारवाई का करत नाहीत ? – संपादक)
राज्यातील सर्व ५२३ दस्त नोंदणी कार्यालये बंद !
३ किलो गांजा, चारचाकी, दुचाकीसह १० लाख ५० सहस्र रुपयांचा मुद्देमाल कह्यात !
‘मराठी विज्ञान परिषदे’च्या ठाणे विभाग अध्यक्षपदी डॉ. रवींद्र प्रभुदेसाई यांची निवड !
Sewri Mumbai Muslims Attack : क्षुल्लक कारणावरून मुसलमानांकडून हिंदूंना भीषण मारहाण
पन्हाळगड-पावनखिंड ते विशाळगड ऐतिहासिक पदभ्रमण २०२६ उत्साहात !
मुंबईतील आंदोलनातून फहाद अहमद कह्यात !