
मिरज, १३ मे (वार्ता.) – शिवजयंतीच्या निमित्ताने श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या मिरज विभागाच्या वतीने शिवजयंतीच्या निमित्ताने १३ मे या दिवशी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यात १०१ जणांनी रक्तदान केले. याचे उद्घाटन भाजप नगरसेवक श्री. निरंजन आवटी, शिवसेना मिरज शहराध्यक्ष श्री. चंद्रकांत मैगुरे, तसेच मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी युवा हिंदुस्थानचे संस्थापक श्री. नितीन चौगुले, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान मिरज कार्यवाह श्री. विनायक माईनकर, भाजप युवामोर्चाचे श्री. सुमेध ठाणेकर, युवा हिंदुस्थानचे श्री. प्रशांत देसाई यांसह अन्य उपस्थित होते.
या शिबिरास रक्तसंकलनासाठी मिरज शासकीय रुग्णालय रक्तपेढी आणि सांगली येथील हिंदरत्न प्रकाशबापू पाटील ब्लड बँक यांचे सहकार्य लाभले.
तळोजा येथे गोवंशियांच्या मांसाची अवैध वाहतूक; धर्मांधाविरुद्ध गुन्हा नोंद
कल्याण येथे मद्यधुंद तरुणाकडून पोलीस कर्मचार्यावर जीवघेणे आक्रमण !
राजू यादव यांच्याकडून उंचगाव (जिल्हा कोल्हापूर) येथे १२० ज्येष्ठ नागरिकांना छत्री वाटप !
पुणे महापालिकेची विशेष सर्वसाधारण सभा १० घंटे चालूनही पुणेकरांचे प्रश्न अनुत्तरितच !
कुसूर नळपाणीपुरवठा योजनेच्या ठेकेदाराला काळ्या सूचीत टाकले !
कुडाळ शहरातील संशयित बोगस डॉक्टरला पोलीस कोठडी